Cristiano Ronaldo and Georgina Rodriguez married after nearly 10 years together Dainik Gomantak
क्रीडा

Cristiano Ronaldo Wedding: रोनाल्डो अडकला लग्नबंधनात! 10 वर्षांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपनंतर जॉर्जिनियासोबत उरकलं लग्न; जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव

Cristiano Ronaldo Married Georgina Rodriguez: जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक आणि पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने त्याची जोडीदार जॉर्जिनिया रॉड्रिग्जसोबत अखेर लग्नगाठ बांधली.

Manish Jadhav

Cristiano Ronaldo Married Georgina Rodriguez: जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक आणि पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने त्याची जोडीदार जॉर्जिनिया रॉड्रिग्जसोबत अखेर लग्नगाठ बांधली. जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. गेल्या अनेक महिन्यांपासून, विशेषतः फुटबॉल विश्वचषकानंतर या दोघांच्या लग्नाविषयी सोशल मीडियावर विविध चर्चा आणि तर्कवितर्क लढवले जात होते. या सर्व चर्चांना पूर्णविराम देत खुद्द रोनाल्डोने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाच्या अंगठ्या घातलेल्या हातांचा एक सुंदर फोटो शेअर करुन या वृत्ताला दुजोरा दिला.

रोनाल्डोने या फोटोसोबत ‘C (हार्ट) G’ असे कॅप्शन दिले असून, या बातमीने जगभरातील त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला.

जवळपास एक दशकापासून एकमेकांसोबत राहणाऱ्या ख्रिस्तियानो आणि जॉर्जिनिया यांनी हा लग्नसोहळा अतिशय गुप्त ठेवला होता. पोर्तुगालची राजधानी लिस्बनपासून पश्चिमेला सुमारे 20 मैलांवर असलेल्या कासकाईस या किनारपट्टीवरील एका सुंदर रिसॉर्टमध्ये हा लग्न सोहळा संपन्न झाला. या खास सोहळ्याला केवळ त्यांची पाच मुले उपस्थित होती, ज्यामुळे हा क्षण या कुटुंबासाठी अत्यंत भावनिक आणि संस्मरणीय ठरला. जॉर्जिनियाने 11 ऑगस्ट 2025 रोजी त्यांच्या साखरपुड्याची घोषणा केली होती आणि त्यानंतर बरोबर एक वर्षाने हे जोडपे लग्नबंधनात अडकले.

रोनाल्डो आणि जॉर्जिनियाची पहिली भेट 2016 मध्ये माद्रिद येथील एका गुच्ची (Gucci) स्टोअरमध्ये झाली होती, जिथे जॉर्जिनिया काम करत होती. तिने या भेटीचे वर्णन 'लव्ह ॲट फर्स्ट साईट' असे केले होते. एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, रोनाल्डोसोबत तिला नेहमीच एक शांतता जाणवायची. गेल्या 10 वर्षांत या जोडप्याने आपले एक सुंदर कुटुंब केले असून ते पाच मुलांचे संगोपन करत आहेत. यामध्ये इव्हा मारिया आणि मातेओ ही 9 वर्षांची जुळी मुले, 8 वर्षांची अलाना, 4 वर्षांची बेला आणि 16 वर्षांचा ख्रिस्तियानो ज्युनियर यांचा समावेश आहे.

रोनाल्डोच्या फुटबॉल कारकिर्दीतील अनेक चढ-उतारांमध्ये जॉर्जिनिया खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहिली. जागतिक स्तरावर अफाट प्रसिद्धी असूनही या जोडप्याने नेहमीच आपले खाजगी आयुष्य प्रसिद्धीच्या झोतापासून दूर ठेवणे पसंत केले आणि आता लग्नाची अधिकृत घोषणा करुन त्यांनी आपल्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाला सुरुवात केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT