Cristiano Ronaldo: रोनाल्डो नाहीच, फुटबॉलप्रेमींचा हिरमोड; विश्रांतीसाठी सुपरस्टार खेळाडू रियाधमध्येच, तरीही सामन्याची तिकिटे संपली

Cristiano Ronaldo In Goa: सौदी अरेबियातील अल नस्सर एफसी संघ पाचवेळच्या सर्वोत्तम जागतिक फुटबॉलपटूच्या अनुपस्थितीत राज्यात दाखल झाला.
Cristiano Ronaldo:
Cristiano Ronaldo:Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : एफसी गोवाविरुद्धच्या एएफसी चँपियन्स लीग-२ फुटबॉल स्पर्धेतील सामना खेळण्यासाठी जगप्रसिद्ध पोर्तुगीज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो गोव्यात येणार आणि त्याला फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर प्रत्यक्ष खेळताना पाहायला मिळणार, ही तमाम गोमंतकीयांची आशा फोल ठरल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे.

सौदी अरेबियातील अल नस्सर एफसी संघ पाचवेळच्या सर्वोत्तम जागतिक फुटबॉलपटूच्या अनुपस्थितीत राज्यात दाखल झाला. या सुपरस्टार फुटबॉलपटूने अखेर गोव्याकडे पाठ फिरविली.

अल नस्सर व एफसी गोवा यांच्यातील सामना बुधवारी (ता. २२) फातोर्डा येथे खेळला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीच्या अनुषंगाने दाबोळी विमानतळावर अल नस्सर क्लबला घेऊन येणाऱ्या विमानास परवानगी मिळाली नाही. नंतर खराब हवामानाचा अडथळा दूर झाल्यानंतर विमान मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. त्यात चाळीस वर्षीय रोनाल्डोचा समावेश नव्हता.

Cristiano Ronaldo:
Goa Rain: ऐन दिवाळीत 'बळीराजा' संकटात! हातातोंडाशी आलेला घास पाण्यात; 5 दिवसांसाठी Yellow Alert जारी

...या कारणामुळे हुकले आगमन

रोनाल्डो गोव्यात न येण्याविषयी ‘अल नस्सर एफसी’चे पोर्तुगीज प्रशिक्षक जॉर्ज जेझूस यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले, की प्रत्येकाला ख्रिस्तियानो रोनाल्डो आवडतो, त्याचे जगभरात भरपूर चाहते आहेत.

मात्र, आम्ही सौदी अरेबियाबाहेर खेळताना त्याला विश्रांती देण्याचे ठरविले आहे. प्रत्येकाला त्याला खेळताना पाहायचे, भेटायचे असते; पण पुढील सामन्याच्या तयारीच्या दृष्टीने आम्ही त्याला रियाधमध्येच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

...तरीही सामन्याची तिकिटे संपली

‘एफसी गोवा’च्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जरी रोनाल्डो बुधवारच्या सामन्यासाठी गोव्यात आला नसला, तरी तिकिटे संपली आहेत. उद्या सायंकाळी स्टेडियम हाऊसफुल्ल होण्याचे संकेत आहेत.

Cristiano Ronaldo:
Goa Politics: 'विरोधकांनी भ्रमात राहू नये', 'नरकासुर' संबोधल्यानंतर CM प्रमोद सावंतांचा जोरदार पलटवार

राज्य सरकार, गोवा पोलिस यांचे बहुमूल्य सहकार्य मिळाले आहे. त्यामुळे सामन्याचे आयोजन यशस्वी ठरेल. अल नस्सर संघात रोनाल्डो नसला, तरी सादियो माने, जुवांव फेलिक्स आदी नावाजलेले खेळाडू आहेत, त्यामुळेही तिकिटांना मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com