Cristiano Ronaldo Dainik Gomantak
क्रीडा

Cristiano Ronaldo fined: रोनाल्डोला धक्का! दोन सामन्यांची बंदी अन् दंडाची झाली कारवाई

ख्रिस्तियानो रोनाल्डोवर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली असून 50,000 डॉलर दंडही आकारण्यात आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Cristiano Ronaldo fined: पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो सध्या विविध कारणांनी चर्चेत आहे. आता त्याच्याबाबतीत मोठी बातमी समोर आली असून इंग्लंडच्या फुटबॉल असोसिएशनने त्याच्यावर 50,000 डॉलर दंड आणि 2 सामन्यांची बंदी अशी कारवाई केली आहे. यावर्षाच्या सुरुवातीला एव्हर्टनविरुद्धच्या सामन्यानंतर त्याने चाहत्याबरोबर केलेल्या गैरवर्तनामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

यावर्षी एप्रिलमध्ये एव्हर्टनविरुद्ध 1-0 अशा गोलफरकाने मँचेस्टर युनायटेड संघ पराभूत झाला होता. या पराभवानंतर त्याने एका युवा चाहत्याच्या हाताला मारत त्याचा मोबाईल फोन पाडला होता. याबद्दल त्याच्यावर टीकाही झाली होती. आता या घटनेमुळे त्याला कारवाईला सामोरे जावे लागले आहे.

रोनाल्डोनेही (Cristiano Ronaldo) त्याची चूक मान्य केली होती. दरम्यान, त्याच्यावर ही कारवाई सध्या सुरु असलेल्या फिफा वर्ल्डकपमध्ये (FIFA World Cup 2022) लागू होणार नाही. पण, जरी मँचेस्टर युनायटेडबरोबरील (Manchester United) त्याचा करार संपला असला तरी तो जेव्हा दुसऱ्या क्लबकडे जाईल, तेव्हा मात्र कारवाई लागू होईल.

रोनाल्डोने मागितली होती माफी

चाहत्याबरोबरील त्या घटनेनंतर रोनाल्डोने इंस्टाग्रामवर पोस्ट करत माफीही मागितली होती. त्याने म्हटले होते, 'आम्ही ज्या कठीण परिस्थितीचा सामना करत आहोत, अशा परिस्थितीत भावनांना आवरणे सोपे नसते. असे असले तरी, आम्ही या खेळाची आवड असलेल्या सर्व तरुणांसमोर नेहमीच आदर, संयम राखला पाहिजे आणि आदर्श ठेवला पाहिजे.'

'मी माझ्या भावनांच्या झालेल्या उद्रेकाबद्दल माफी मागतो. निष्पक्ष खेळ आणि खिलाडूवृत्ती लक्षात घेत शक्य असल्यास, मी या चाहत्याला ओल्ड ट्रॅफर्ड येथे सामना पाहण्यासाठी निमंत्रित करू इच्छितो.'

रोनाल्डोने सोडली युनायटेडची साथ

दरम्यान, रोनाल्डो आणि मँचेस्टर युनायटेड यांनी नुकतेच आपले मार्ग वेगळे केले आहेत. रोनाल्डोने युनायडेटच्या मॅनेजरवर केलेल्या टीकेमुळे त्याचे आणि क्लबचे संबंध बिघडल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी आता परस्पर सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता रोनाल्डो फ्री एजंट आहे.

त्याचबरोबर, सध्या रोनाल्डो पोर्तुगाल संघासह फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेत सहभागी झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT