Cristiano Ronaldo will continue to play from Juventus amid transfer rumours Dainik Gomantak
क्रीडा

क्लब बदलण्याच्या अफवांना Cristiano Ronaldoचा पूर्णविराम

ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) येत्या काही दिवसात दुसऱ्या क्लबकडून खेळणार का अशी चर्चा होती

Akshay Badwe

ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) येत्या काही दिवसात दुसऱ्या क्लबकडून खेळणार का अशी चर्चा होती बुधवारी मात्र रोनाल्डोने या गोष्टीवर मौन सोडले आणि मीडियाच्या कव्हरेजवर निराशा व्यक्त केली. रोनाल्डोला त्याच्या युवेंटस (Juventus) करारात एक वर्ष शिल्लक आहे पण पोर्तुगाल (Portugal) स्टार ट्यूरिन क्लबपासून दूर जाण्याच्या शोधात असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून होती. (Cristiano Ronaldo finally breaks silence on his transfer rumours)

लिओनेल मेस्सी (Lionel Messi) याने एफ सी बार्सिलोना सोडल्यानंतर रोनाल्डो देखील आता युवेंटस क्लब सोडणार का अशी कुजबुज फुटबॉल फॅन्स मध्ये होती. काही वृत्तपत्रांनी या बातमीला दुजोरा देखील दिला होता. आता मात्र थेट रोनाल्डोने स्वतःच इंस्टाग्रामवर या चर्चेला पूर्णविराम दिला.

"जो कोणी मला ओळखतो त्याला माझं माझ्या कामावर किती लक्ष केंद्रित आहे याची जाणीव आहे. कमी बोलणे आणि अधिक कृती करणे. माझ्या कारकीर्दीच्या प्रारंभापासून हे माझे बोधवाक्य आहे. तथापि, अलीकडे जे काही सांगितले आणि लिहिले गेले आहे ते पाहता, माझ्याकडे माझे निश्चित स्थान आहे, असे रोनाल्डोने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे. "मला अनेक वेगवेगळ्या लीगमधील अनेक क्लब बरोबर वारंवार जोडलेल्या बातम्या आणि कथा समोर येत आहेत, ज्याबद्दल कोणालाही चिंता नाही आणि कोणी सत्य शोधण्याचा प्रयत्न देखील करत नाहीत," अशी खंत रोनाल्डोने व्यक्त केली.

रोनाल्डो पुढे असं म्हणाला की "रिअल माद्रिद मधील माझी कथा लिहिली गेली आहे. ती रेकॉर्ड केली गेली आहे. शब्द, संख्येत, ट्रॉफी आणि शीर्षकामध्ये, रेकॉर्डमध्ये. मला माहित आहे की रिअल माद्रिदचे खरे चाहते माझ्या हृदयात कायम राहतील आणि त्यांच्या मनामध्ये माझे स्थान कायम राहील." रोनाल्डो आता मँचेस्टर सिटीकडून देखील खेळू शकतो अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. मात्र आता रोनाल्डोनेच या गोष्टीला असत्य मानले आहे.

यंदाच्या मोसमात युवेंटस ने मॅसिमिलियानो अलेग्रीला संघ प्रशिक्षकपदी निवडून दिले आहे. युवेंटस आपला पहिला सामना २२ ऑगस्टला उदिनीस विरुद्ध खेळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: कशाला घाई केली मित्रा...! Shubman Gill चा स्वतःच्या पायावर धोंडा, भडकला गौतम गंभीर; टीम इंडिया अडचणीत

Goa Assembly: आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेवरुन आलेमाव बरसले, 'सत्तरी' पॅटर्नवर उपस्थित केले सवाल; वाचा दिवसभरातील घडामोडी

IND vs ENG: इंग्लंडमध्ये केएल राहुलचा जलवा, करिअरमध्ये पहिल्यांदाच नोंदवले 'हे' 3 मोठे रेकॉर्ड; लवकरच गावस्करांनाही सोडणार मागे!

महात्मा गांधी म्हणाले होते 'दारु सोडा', अवैध मद्य तस्करीवरुन विजय सरदेसाईंनी दिले PM मोदींच्या गुजरातचे उदाहरण

Viral Video: आजीबाईचा 'स्वॅग'च निराळा! सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय तूफान व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT