Mayank Agarwal X/BCCI
क्रीडा

Mayank Agarwal: मयंकने प्यायले विषारी पाणी? हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर केली पोलिसांकडे तक्रार

Pranali Kodre

Mayank Agarwal Files Police Complaint After Hospitalized For Drinking Poisonous Liquid:

मंगळवारी भारताचा फलंदाज मयंक अगरवालबद्दल धक्कादायक बातमी समोर आली होती. मंगळवारी रात्री असे समजले होते की त्याला राजकोटला जाण्यापूर्वीच त्रिपूरामध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, आता याबद्दल नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. या घटनेबद्दल तो पोलीस तक्रारही करणार आहे.

कर्नाटककडून त्रिपूराविरुद्धचा रणजी सामना खेळल्यानंतर तो पुढील सामना खेळण्यासाठी प्रवास करत होता. त्यावेळी प्लेनमध्ये त्याच्या सीटवर ठेवलेल्या पाऊचमधील द्रव्य त्याने पाणी म्हणून प्यायले.

त्यानंतर त्याला घशात जळजळळ आणि पोटदुखी झाल्याची माहिती मिळाली. त्याला ते द्रव्य पिल्यानंतर लगेचच त्रास सुरू झाल्याने तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून तो धोक्याच्या बाहेर आहे.

तथापि, त्याने पिलेल्या द्रव्याबद्दल सध्या संशय व्यक्त होत आहे. ते विषारी द्रव्य असू शकते, अशीही चर्चा आहे.

या घटनेबद्दल मयंकने त्याच्या मॅनेजरकडून पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे.

पश्चिम त्रिपूराचे पोलीस अधीक्षक किरण कुमार यांनी याबद्दल पीटीआयला सांगितले की 'आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू मयंक अगरवालचे प्रकृती सध्या स्थिर आहे. पण त्याचे मॅनेजरने या प्रकरणात तपासासाठी एनसीसीपीएसच्या(न्यू कॅपिटल कॉम्प्लेक्स पोलीस स्टेशन) अंतर्गत वेगळी तक्रार दाखल केली आहे.'

त्याचबरोबर पोलिसांनी सांगितले की त्याच्या मॅनेजरने माहिती दिली की जेव्हा तो प्लेनमध्ये बदला, तेव्हा त्याच्या समोर एक पाकिट होते. त्याने त्यातील द्रव्य थोडेसेच प्यायले.

पण लगेचच त्याला तोंडात त्रास व्हायला लागला आणि तो काही बोलू शकत नव्हता. त्याला आयएलएस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्याच्या तोंडात सुच आणि अल्सर होते. बाकी त्याची प्रकृती ठिक आहे.

दरम्यान, या घटनेमुळे मयंक रेल्वेविरुद्ध 2 फेब्रुवारीपासून सुरतला होणारा रणजी सामना खेळणार नाही. खरतंर मयंक कर्नाटक संघाचा कर्णधार आहे.

कर्नाटकाने आत्तापर्यंत रणजी ट्रॉफी 2023-24 स्पर्धेत पंजाब विरुद्ध विजय मिळवला आहे, तर गुजरात विरुद्ध पराभव स्विकारला आहे. तसेच गोव्याविरुद्धचा सामना अनिर्णित राहिला. याशिवाय त्रिपुराविरुद्ध कर्नाटकने विजय मिळवला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT