Shocking Cricket Incidence in 2023 X
क्रीडा

Year Ending: मॅथ्यूज टाईम आऊट ते IPL लिलाव, 2023 मधील 'या' 5 घटनांनी क्रिकेट चाहत्यांना केलं चकीत

Cricket Shocking Incidence: क्रिकेटविश्वात 2023 वर्षात सर्वांनाच चकीत करणाऱ्या 5 घटनांचा घेतलेला आढावा.

Pranali Kodre

Shocking Cricket Incidence in 2023:

साल 2023 आता संपत आहे. हे वर्ष क्रिकेटसाठी खूप महत्त्वाचे ठरले. याच वर्षात कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना आणि वनडे वर्ल्डकपही खेळवण्यात आला.

दरम्यान, या वर्षात अशाही काही घटना घडल्या, ज्याची प्रचंड चर्चा रंगली. काही घटना अशाही होत्या, ज्यामुळे खेळाडूंनाच नाही, तर चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. अशाच 2023 मध्ये क्रिकेटविश्वात घडलेल्या पाच घटनांचा आढावा घेऊ, ज्याने सर्वांनाच अवाक् केले.

1. वेस्ट इंडिज वर्ल्डकपमधून बाहेर

यावर्षी भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान वनडे वर्ल्डकप खेळवण्यात आला. मात्र, या स्पर्धेत माजी विश्वविजेता संघ वेस्ट इंडिज खेळला नाही. कारण या स्पर्धेसाठी झिम्बाब्वेमध्ये झालेल्या क्वालिफायर स्पर्धेत वेस्ट इंडिजला मोठे अपयश आले, त्यामुळे ते वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी पात्रताच मिळवू शकले नाहीत. त्यामुळे अनेकांना धक्का बसला होता.

विशेष म्हणजे वनडे इतिहासातील पहिले दोन वर्ल्डकप जिंकणारा वेस्ट इंडिज संघ पहिल्यांदाच ही स्पर्धा खेळला नाही. त्यामुळे त्यांना 2025 साली होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधूनही बाहेर व्हावे लागले. कारण वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील पहिले 8 संघच या स्पर्धेसाठी पात्र ठरणार होते.

2. अँजेलो मॅथ्यूज झाला 'टाईम आऊट'

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत 6 नोव्हेंबर रोजी श्रीलंका विरुद्ध बांगलादेश संघात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सामना झाला होता. या सामन्यात बांगलादेशने 3 विकेट्सने विजय मिळवला होता, पण या सामन्यात अँजेलो मॅथ्यूजला टाईम आऊट दिल्याने बराच वाद झाला.

या सामन्यात श्रीलंका प्रथम फलंदाजीला उतल्यानंतर 25 व्या षटकात दुसऱ्या चेंडूवर सदीरा समरविक्रमाला बांगलागदेशचा कर्णधार शाकिब अल हसनने 41 धावांवर बाद केले.

त्यावेळी सहाव्या क्रमांकावर अँजेलो मॅथ्यूज फलंदाजीला उतरणार होता, तो मैदानात आलाही, पण पहिला चेंडू खेळण्यापूर्वीच हेल्मेटची समस्या झाल्याने परत गेला. त्यावेळी बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन आणि संघाने त्याच्याविरुद्ध टाईम आऊट नियमानुसार बादसाठी पंचांकडे अपील केले.

पंचांनाही नियमानुसार त्याला बाद द्यावे लागले. त्याने नंतर शाकिब आणि पंचांकडे हा निर्णय मागे घेण्यासाठी विनवणी केली, मात्र बांगलादेशने त्यांचा निर्णय मागे घेतला नाही.

3. पायाला क्रॅम्प आल्यानंतरही मॅक्सवेलचं द्विशतक

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत 7 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान संघात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना झाला, ज्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 3 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने द्विशतक ठोकले.

विशेष म्हणजे ही खेळी करताना त्याच्या पायात आणि नंतर शरीरभर क्रॅम्प्स येत होते. यासाठी त्याने मैदानावरच अनेकदा उपचारही घेतले. या क्रॅम्प्समुळे त्याला फार पायाची हालचालही करता येत नव्हती. अशावेळी त्याने पाय फार न हलवता तडाखेबंद फटके खेळत ही द्विशतकी खेळी साकारली.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की या सामन्यात अफगाणिस्तानच्या 292 धावांच्या आव्हानाच पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 91 धावांत 7 विकेट्स गमावल्या होत्या. अशावेळी मॅक्सवेलने जबाबदारी घेत 128 चेंडूत 21 चौकार आणि 10 षटकारांसह 201 धावांची नाबाद खेळी केली.

ही खेळी करताना त्याने कर्णधार पॅट कमिन्सबरोबर आठव्या विकेटसाठी नाबाद 202 धावांची भागीदारी केली होती. मॅक्सवेलच्या या खेळीचे सर्वांनीच कौतुक केले होते.

4. भारताचं वर्ल्डकप विजयाचं स्वप्न भंगलं

भारतात झालेल्या वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारतीय संघाला प्रबळ दावेदार समजले जात होते. भारतीय संघ या संपूर्ण स्पर्धेत खेळलाही तसाच.

भारताने साखळी फेरीतील सर्व 9 सामने जिंकले, तसेच उपांत्य फेरीतही न्यूझीलंडला पराभूत करत अंतिम सामना गाठला होता. त्यामुळे सलग 10 सामने जिंकल्यानंतर भारतीय संघ अंतिम सामनाही जिंकू शकतो, याबद्दल अनेकांनी अंदाज व्यक्त केले होते.

मात्र, अंतिम सामन्यात अपराजित भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 6 व्यांदा वर्ल्डकप जिंकला. मात्र भारताचे तिसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगले होते. यामुळेही अनेक चाहत्यांना धक्का बसला.

5. आयपीएल लिलावात पहिल्यांदाच 20 कोटींची बोली

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईतील कोका-कोला एरिनामध्ये पार पडला. यावेळी लिलावाच्या इतिहासात पहिल्यांदा एखाद्या खेळाडूला 20 कोटींहून अधिकची बोली लागली.

या लिलावादरम्यान मिचेल स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने विक्रमी 24.75 कोटी रुपयांची बोली लावली. तसेच कमिन्ससाठी सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटी रुपये मोजत संघात घेतले. त्यामुळे हे दोघे आयपीएलमधील सर्वात महागडे खेळाडूही ठरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोगो'वरुन गदारोळ, युरी आलेमावांनी गॅझेट फाडून हवेत भिरकावले, खुर्च्या उचलण्याचा प्रयत्न; MLA वीरेश बोरकरांना काढले सभागृहातून बाहेर

eSakal No 1: ई-सकाळचा करिष्मा कायम! 21.2 दशलक्ष वाचकांसह पुन्हा 'नंबर वन'

Video: चोरट्याची फजिती! स्कूटी घसरली, हेल्मेट पडलं अन् स्वतःही पडला; सोशल मीडियावरील 'हा' व्हिडिओ एकदा बघाच

IND vs ENG 4th Test: ओल्ड ट्रॅफर्डवर जो रुटचा दबदबा, द्रविड-कॅलिसला मागे टाकून रचला इतिहास; नावावर केला 'हा' मोठा रेकॉर्ड

Goa Assembly: पोगो ठरावावरुन विधानसभेत राडा, सभापती संतापले, वीरेश बोरकरांना सभागृहातून काढले बाहेर; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT