Sachin Tendulkar Dainik Gomantak
क्रीडा

Sachin Tendulkar वर शुभेच्छांचा वर्षाव!सेहवागचे शिर्षासन, तर युवी म्हणाला, 'तो आला, खेळला आणि जिंकला...'

क्रिकेट विश्वातून सचिन तेंडुलकरवर शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे.

Pranali Kodre

Sachin Tendulkar Birthday: मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज म्हणजेच 24 एप्रिल 2023 रोजी त्याचा 50 वा वाढदिवस साजरा केला. जगातील महान फलंजदाजांपैकी एक असलेल्या सचिनवर आज जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्याला चाहत्यांनीच नाही, तर अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी, जगभरातील विविध मान्यवरांनी सोशल मीडियातून शुभेच्छा दिल्या.

सचिन गोव्यात दाखल

सचिनने त्याच्या हा 50 वा वाढदिवसाआधी काल गोव्यात आला होता. त्यामुळे तो गोव्यातच त्याचा हा वाढदिवस साजरा करणार असल्याचे म्हटले जात होते. त्याने त्याच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त गोव्यात निवांत चहा पित असतानाचा फोटोही शेअर केला होता.

सचिनला मिळाल्या जगभरातून शुभेच्छा

भारताचे दिग्गज अष्टपैलू आणि माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सचिनला बिग बॉस म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच युवराज सिंगने शुभेच्छा देताना लिहिले की 'तो आला, त्याने खेळले आणि त्याने 4 पिढ्यांची मनं जिंकली. चांगले किंवा वाईट दिवस, शतक होवो किंवा नाही, त्याची मान नेहमीच ताठ राहिली आणि पाय जमीनीवर. दीर्घकाळाच्या यशासाठी त्याने आम्हाला योग्य मार्ग स्विकारण्यास शिकवले.'

याशिवाय ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ब्रेट ली याने लिहिले की 'गेल्या अनेक वर्षांत मी तुझी अनेक अर्धशतकं पाहिली आहेत. पण हे तुझे सर्वोत्तम आहे. दिग्गज खेळाडूला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू अजून खूप वाढदिवस साजरे करावेस.'

व्हीव्हीएस लक्ष्मणने त्याचा संघसहकारी आणि मित्र सचिनला अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने लिहिले की 'सच म्हणजे सत्य, सच म्हणजे आयुष्य, सच हे उत्तर आहे, सच हाच मार्ग आहे. एका प्रेरणादायी, आदर्श व्यक्तीला आणि खऱ्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा'

भारताची फलंदाज स्मृती मंधानानेही सचिनला शुभेच्छा देताना लिहिले की 'वाढदिवसाच्या शुभेच्छा सचिन सर. क्रिकेटपटूंच्या पिढ्यांना प्रेरणा दिल्याबद्दल आभार.'

त्याचबरोबर विरेंद्र सेहवागने त्याचा सलामीचा जोडीदार सचिनला शिर्षासन करत हटके शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने लिहिले की 'मैदानावर जे तू सांगितले, पण त्यापेक्षा मी उलटेच वागलोय. त्यामुळे तुझ्या 50 व्या वाढदिवसाला तुला शिर्षासन करून शुभेच्छा द्यायच्याच होत्या.'

याशिवाय देखील सचिनला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

सचिनने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सर्वाधिक 664 सामने खेळताना 48.52 च्या सरासरीने 34357 धावा केल्या. यामध्ये त्याच्या 100 शतकांचा समावेश आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा, सर्वाधिक धावा करणारा आणि सर्वाधिक शतके करणारा खेळाडू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT