Sachin Tendulkar @50: मास्टर-ब्लास्टरच्या नावावर असलेले 'हे' 50 विश्वविक्रम माहित आहेत का?

सचिन तेंडुलकर आज 50 वा वाढदिवस साजरा करत असून त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या 50 विक्रमांचा घेतलेला आढावा.
Sachin Tendulkar
Sachin TendulkarDainik Gomantak
Published on
Updated on

Sachin Tendulkar 50th Birthday: क्रिकेटचा देव, मास्टर-ब्लास्टर अशी अनेक बिरूदं मिळवलेल्या सचिन तेंडुलकरचा 24 एप्रिल 2023 रोजी म्हणजेच आज 50 वा वाढदिवस आहे. युवराज सिंग, एमएस धोनी, विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ यांच्यापासून सध्याच्या युवा क्रिकेटपटूंपर्यंत अनेकांसाठी सचिन आदर्श राहिला आहे. त्याने 24 वर्षांच्या कारकिर्दीत मोठे यश संपादन केले.

15 नोव्हेंबर 1989 साली रोजी वयाच्या 16 व्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध भारताकडून पदार्पण केले. त्यानंतर त्याने तब्बल 24 वर्षे क्रिकेट खेळताना सातत्याने दमदार कामगिरी करत त्याचे नाव सर्वोच्च ठिकाणी पोहोचवले. सचिन 16 नोव्हेंबर 2013 रोजी भारताकडून अखेरच्यावेळी मैदानात उतरला होता.

दरम्यान, त्याच्या या कारकिर्दीत त्याने अनेक विक्रम केले, त्यातीलच त्याच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त 50 विक्रमांचा आढावा घेऊ.

सचिनचे 50 विक्रम...

  • सचिनने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सर्वाधिक 664 सामने खेळताना 48.52 च्या सरासरीने 34357 धावा केल्या.

  • सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके करणारा पहिला आणि सध्या एकमेव क्रिकेटपटू आहे.

  • सचिनने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 664 सामन्यांपैकी कसोटी क्रिकेटमध्ये 200 आणि वनडे क्रिकेटमध्ये 463 सामने खेळले आहेत. तसेच त्याने 1 आंतरराष्ट्रीय टी20 सामनाही खेळला आहे. महत्त्वाचे म्हणजे तो वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्येही सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू आहे.

  • सचिन सध्या कसोटीत 200 सामने खेळणारा पहिला आणि एकमेव क्रिकेटपटू आहे.

  • सचिनने कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचाही विक्रम केला असून त्याने 53.78 च्या सरासरीने 15921 धावा केल्या आहे.

  • वनडेतही तो सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटपटू असून त्याने 44.83 च्या सरासरीने 18426 धावा केल्या आहेत.

  • सचिनने 100 आंतरराष्ट्रीय शतकांपैकी 51 शतके कसोटी क्रिकेटमध्ये केली असून तोही एक विश्वविक्रम आहे.

  • सचिन 50 कसोटी शतके करणारा सध्या जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे.

  • सचिन वनडेमध्ये द्विशतक करणारा पहिला पुरुष क्रिकेटपटू आहे. त्याने 24 फेब्रुवारी 2010 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 200 धावांची खेळी केली होती.

  • सचिनने वनडेतही सर्वाधिक 49 शतके करण्याचा विक्रम केलेला आहे.

  • सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 201 विकेट्सही घेतल्या आहेत.

  • सचिन कसोटी सर्वाधिकवेळा नव्वदीतील धावांची खेळी (90 ते 99 धावा) करणारा खेळाडू आहे. त्याने 10 वेळा नव्वदीतील धावांची खेळी केली आहे.

  • सचिन आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सर्वाधिक चौकार मारणारा खेळाडू असून त्याने 4076 पेक्षा अधिक चौकार मारले आहेत.

  • सचिन कसोटीमध्ये सर्वाधिक चौकार मारणाराही खेळाडू असून त्याने 2058 पेक्षा अधिक चौकार मारले आहेत.

  • सचिनने वनडेत सर्वाधिक 2016 चौकार मारले आहेत.

Sachin Tendulkar
Sachin Tendulkar: 50 वा वाढदिवस गोव्यात; सचिन तेंडुलकर पत्नी, मुलीसह राज्यात दाखल, पाहा व्हिडिओ
  • सचिन वनडेत सर्वाधिक 96 अर्धशतके करणाराही खेळाडू आहे.

  • सचिन भारताकडून सर्वात कमी वयात कसोटी पदार्पण करणारा पुरुष क्रिकेटपटू आहे. त्याने 15 नोव्हेंबर 1989 रोजी पाकिस्तानविरुद्ध भारताकडून पदार्पण केले, तेव्हा त्याचे वय 16 वर्षे 205 दिवस इतके होते.

  • सचिन भारताकडून वनडेत पदार्पण करणारा सर्वात युवा पुरुष क्रिकेटपटू आहे. त्याने 18 डिसेंबर 1989 रोजी पाकिस्तानविरुद्ध वनडेत भारताकडून पदार्पण केले, तेव्हा त्याचे वय 16 वर्षे 238 दिवस इतके होते.

  • वनडे क्रिकेट सर्वाधिक काळ खेळणारा क्रिकेटपटू होण्याचा मानही सचिनला मिळालेला आहे. तो 22 वर्षे 91 दिवस भारतासाठी वनडे क्रिकेट खेळला. तो पहिला सामना 18 डिसेंबर 1989 रोजी खेळला होता, तसेच अखेरचा वनडे सामना तो 18 मार्च 2012 रोजी खेळला.

  • सचिन भारताकडून सर्वाधिक काळ कसोटी क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. त्याने 24 वर्षे 1 दिवस इतके कालावधीत भारताचे कसोटीत प्रतिनिधित्व केले.

  • सचिन मन्सुर अली खान पतौडी यांच्यानंतरचा भारताचा सर्वात युवा कसोटी कर्णधारही आहे. त्याने 23 वर्षे 169 दिवस वय असताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1996 साली दिल्ली कसोटीत पहिल्यांदा भारताचे नेतृत्व केले होते.

  • सचिन कसोटीत सर्वात कमी वयात शतक करणारा भारतीय पुरुष क्रिकेटपटू आहे. त्याने 17 वर्षे 107 दिवस वय असताना इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर कसोटीत ऑगस्ट 1990 मध्ये पहिले शतक केले होते.

  • वनडेत एका वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही सचिन अव्वल क्रमांकावर आहे. त्याने 1998 साली 65.31 च्या सरासरीने 34 वनडेत 1894 धावा केल्या होत्या.

  • सचिन एका वर्षात सर्वाधिक वनडे शतके करणाराही खेळाडू असून त्याने 1998 साली वनडेत 9 शतके केली होती.

  • सचिन एका वर्षात सर्वाधिक 12 आंतरराष्ट्रीय शतके करणाराही खेळाडू आहे. त्याने 1998 साली 12 शतके केली होती.

  • सचिनने 1994, 1996, 1997, 1998, 2000, 2003 आणि 2007 अशा सात वर्षी प्रत्येकी वनडेत 1000 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

  • सचिनने कसोटीत 1997, 1999, 2001, 2002, 2008 आणि 2010 अशा सहा वर्षी प्रत्येकी 1000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. हा देखील एक विश्वविक्रम आहे.

  • एका वर्षात कसोटीत सर्वाधिक शतके करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत 7 शतकांसह सचिन रिकी पाँटिंग, विव रिचर्ड्स आणि अरविंद डी सिल्वासह संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिनने 2010 साली कसोटीत 7 शतके ठोकली होती. या यादीत अव्वल क्रमांकावर मोहम्मद युसूफ असून त्याने 2006 मध्ये 9 कसोटी शतके केली होती.

  • सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक मालिकावीर (मॅन ऑफ द सिरीज) पुरस्कार जिंकणारा खेळाडू आहे. त्याने 20 वेळा मालिकावीर पुरस्कार जिंकला आहे.

  • सचिनने वनडेमध्ये सर्वाधिक 62 वेळा सामनावीराचा (मॅन ऑफ द मॅच) पुरस्कार जिंकला आहे.

Sachin Tendulkar
Sachin Tendulkar: कशी होती मास्टर-ब्लास्टरबरोबर पहिली भेट? युवीने दिला आठणींना उजाळा
  • सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 76 सामनावीर पुरस्कार जिंकणारा खेळाडू आहे.

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही सचिन अव्वल क्रमांकावर असून त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण 20 शतके केली आहेत.

  • सचिन सर्वात जलद 10000 कसोटी धावा करणाराही खेळाडू आहे. या यादीत तो ब्रायन लारा आणि कुमार संगकारा यांच्यासह संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आहे. या तिघांनीही प्रत्येकी 195 डावात 10000 कसोटी धावा पूर्ण केल्या होत्या.

  • सचिन कसोटीत सर्वात जलद 13 हजार, 14 हजार आणि 15 हजार धावा करणाराही खेळाडू आहे. त्याने 266 डावात 13 हजार, 279 डावात 14 हजार आणि 300 डावात 15 हजार कसोटी धावा केल्या होत्या.

  • सचिन वनडेत सर्वात जलद 13 हजार, 14 हजार, 15 हजार, 16 हजार, 17 हजार आणि 18 हजार धावा करणारा क्रिकेटपटूही आहे. त्याने 321 डावात 13 हजार धावा, 350 डावात 14 हजार, 377 डावात 15 हजार, 399 डावात 16 हजार, 424 डावात 17 हजार आणि 440 डावात 18 हजार धावा केल्या आहेत.

  • सचिन वनडेत एकाच संघासाठी सर्वाधिक सलग सामने खेळणाराही खेळाडू आहे. त्याने भारतासाठी 25 एप्रिल 1990 ते 24 एप्रिल 1998 दरम्यान एकही सामना न मुकता 185 वनडे सामने खेळले.

  • सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका संघासाठी सर्वाधिक सलग सामने खेळणाराही खेळाडू असून त्याने भारतासाठी 25 एप्रिल 1990 ते 24 एप्रिल 1998 दरम्यान एकाही सामन्याला न मुकता 239 सामने खेळले.

  • सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शुन्यावर बाद न होता सलग 136 डाव खेळणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. या यादीत राहुल द्रविड अव्वल क्रमांकावर असून तो सलग 173 डावात शुन्यावर बाद झाला नव्हता.

  • सचिन वनडेत 10000 धावा आणि 100 विकेट्स घेणाऱ्या मोजक्या क्रिकेटपटूंच्या यादीत देखील आहे.

  • सचिन एकाच वनडे सामन्यात शतक आणि चार किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणाऱ्या जगातील 15 क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ढाका येथे 28 ऑक्टोबर 1998 रोजी झालेल्या वनडे सामन्यात 141 धावा केल्या होत्या, तसेच 38 धावांत 4 विकेट्स घेतल्या होत्या.

  • सचिनने कसोटीत 6 द्विशतके केली आहेत. तो सर्वाधिकवेळा कसोटीत द्विशतके करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत 7 व्या क्रमांकावर आहे.

  • सचिन कसोटीत सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत 69 षटकारांसह चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्यापुढे विरेंद्र सेहवाग (91), एमएस धोनी (78) आणि रोहित शर्मा (69) हे खेळाडू आहेत.

  • सचिन वनडेत 10 हजार ते 18 हजार धावा करणारा पहिला क्रिकेटपटू आहे.

  • सचिन कसोटीत 12 हजार ते 15 हजार धावा करणारा पहिला क्रिकेटपटू आहे.

  • सचिनने वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक 9 वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकला आहे.

  • सचिन तेंडुलकरने राहुल द्रविडबरोबर मिळून न्यूझीलंडविरुद्ध 8 नोव्हेंबर 1999 रोजी वनडेत दुसऱ्या विकेटसाठी 331 धावांची भागीदारी केली होती. ही भारतासाठी सर्वोच्च वनडे भागीदारी आहे.

  • सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मायदेशाबाहेर सर्वाधिक शतके करणाराही क्रिकेटपटू आहे. त्याने भारताबाहेर 58 आंतरराष्ट्रीय शतके केली आहेत.

  • वनडे वर्ल्डकपमध्ये 2000 हून अधिक धावा करणारा सचिन एकमेव क्रिकेटपटू आहे. त्याने वर्ल्डकपमध्ये 2278 धावा केल्या आहेत.

  • सचिनने एकाच वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक 673 धावा करण्याचाही विश्वविक्रम केला आहे. त्याने 2003 साली झालेल्या वर्ल्डकपमध्ये या धावा केल्या होत्या.

  • सचिनने रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी आणि इराणी ट्रॉफी या स्पर्धामध्ये पदार्पणाच्या सामन्यातच शतके करण्याचा कारनामानाही केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com