Shane Warne  Dainik Gomantak
क्रीडा

Cricket Australia: भारीच ना! शेन वॉर्नच्या नावाने क्रिकेट ऑस्ट्रेलिया देणार 'हा' मानाचा पुरस्कार

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वॉर्नच्या सन्मानार्थ महत्त्वाच्या पुरस्काराचे नाव बदलले आहे.

Pranali Kodre

Shane Warne: ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सोमवारपासून कसोटी मालिकेचा दुसरा सामना सुरू झाला आहे. हा सामना बॉक्सिंग डे कसोटी असून मेलबर्नवर खेळवला जात आहे. दरम्यान, या सामन्यावेळी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मोठी घोषणा केली आहे. त्यांनी दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे नाव वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटू पुरस्काराला देण्याचा निर्णय घेतला आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलिया दरवर्षी सर्वोत्तम कसोटीपटू पुरस्कार देत आहे. पण आता या पुढे या पुरस्काराला शेन वॉर्नच्या नावाने ओळखले जाईल. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वॉर्नच्या सन्मानार्थ हा निर्णय घेतला आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले म्हणाले, 'ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून आणि शेन वॉर्नचे कसोटी क्रिकेटमधील अतुलनीय योगदान लक्षात घेता या पुरस्काराला त्याचे नाव देणे योग्य आहे.'

वॉर्नचे 4 मार्च 2022 रोजी थायलंडमध्ये निधन झाले होते. त्याच्या निधनानंतर पहिल्यांदाच मेलबर्नवर ऑस्ट्रेलियाचा संघ कसोटी सामना खेळत आहे. त्याचमुळे त्याच्या सन्मानार्थ ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांचे खेळाडू बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी पांढरी फ्लॉपी हॅट घालून मैदानात उतरले होते.

(Cricket Australia honoured Shane Warne by renaming men's Test Player of the year award after him)

शेन वॉर्न ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक होता. तो ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याने स्वत:च 2006 साली क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार जिंकला होता. त्याने त्यावर्षी 15 कसोटीत 96 विकेट्स घेतल्या होत्या. यातील 40 विकेट्स त्याने फक्त ऍशेस मालिकेतच घेतलेल्या.

शेन वॉर्नने त्याच्या कारकिर्दीत 145 कसोटी सामन्यांमध्ये 708 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 37 वेळा कसोटीच्या एका डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत, तर 10 वेळा एका कसोटी सामन्यांत 10 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.

दरम्यान, यावर्षी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम कसोटीपटूच्या पुरस्कारासाठी मार्नस लॅब्युशेन, उस्मान ख्वाजा, नॅथन लायन हे प्रबळ दावेदार आहेत. लॅब्युशेनने 2022 या वर्षात 11 कसोटीत 59.25 च्या सरासरीने 948 धावा केल्या आहेत. तर ख्वाजाने 11 कसोटीत 67.50 च्या सरासरीने 1080 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर नॅथन लायनने यावर्षी ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक 44 कसोटी विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT