Football  Dainik Gomantak
क्रीडा

Goa professional league : साळगावकर’च्या जागी कुठ्ठाळी व्हिलेजर्सची निवड

किशोर पेटकर

Cortalim villagers Football Team : साळगावकर एफसी संघ व्यवस्थापनाने सीनियर संघ बंद करण्याचे ठरविल्यानंतर गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेतील रिक्त झालेली जागा आता कुठ्ठाळी व्हिलेजर्सला मिळाली. याविषयी निर्णय गोवा फुटबॉल संघटनेच्या (जीएफए) कार्यकारी समितीने शुक्रवारी घेतला, तसेच मारियान डायस यांची जीएफए तांत्रिक समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली.

प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेच्या 2022-23 मोसमात अकरा संघ होते. 2023-24 मोसपापूर्वी साळगावकर एफसीने स्पर्धेतून माघार घेतली. त्यामुळे रिक्त जागा भरण्याचे ठरले. जीएफएच्या प्रथम विभागीय लीग स्पर्धेच्या २०२२-२३ मोसमात कुठ्ठाळी व्हिलेजर्सला धेंपो स्पोर्टस क्लब ज्युनियर्स व यंग बॉईज ऑफ टोंक (वायबीटी) संघानंतर तिसरा क्रमांक मिळाला होता.

अखेरच्या साखळी सामन्यात इंज्युरी टाईममध्ये गोल नोंदवत वायबीटी संघाने कुठ्ठाळी व्हिलेजर्सला २-१ असे नमवून प्रोफेशनल लीगसाठी पात्रता मिळविली होती. साळगावकर एफसीच्या धक्कादायक माघारीनंतर कुठ्ठाळीच्या संघाला मोसमाअखेर हुकलेली संधी पुन्हा मिळाली. आगामी प्रोफेशनल लीग स्पर्धेत वायबीटी आणि कुठ्ठाळी व्हिलेजर्स हे दोन नवे संघ असतील.

पदोन्नती निर्णय एकमताने

जीएफए कार्यकारी समिती बैठकीनंतर अध्यक्ष कायतान फर्नांडिस यांनी सांगितले, की ‘‘जीएफए कार्यकारी समितीची आज बैठक झाली. त्यावेळी साळगावकर एफसीच्या माघारीनंतर कुठ्ठाळी जिमखान्यास पदोन्नती देण्याचा निर्णय एकमताने झाला.

मोसमात त्यांनी संघावर चांगली रक्कम गुंतविली होती, पण अखेरच्या लढतीत संधी हुकली होती. गोमंतकीय फुटबॉलमध्ये अव्वल श्रेणी गाठण्यासाठी आता ग्रामपातळीवर संघ मोठ्या प्रेरित होतील याचा आम्हाला विश्वास वाटतो. गोमंतकीय फुटबॉलमध्ये आगामी मोसम रोमांचक ठरेल.’’

थेट प्रवेशासाठी मुदतवाढ

गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेतील सध्याच्या ११ संघांत आणखी संघांची भर पडणार असून ‘जीएफए’ने थेट प्रवेशासाठी बोली मागविली आहे. त्यासाठी २१ जुलै २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शुक्रवारच्या जीएफए बैठकीत झाला.

युवा विकासासाठी तांत्रिक समन्वयक

गोव्यातील फुटबॉलमधील युवा आणि तळागाळातील विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी आणि याविषयक संरचनेत सुधारणा करण्यासाठी जीएफएने माजी एआयएफएफ मार्गदर्शक मारियान डायस यांची तांत्रिक समन्वयकपदी नियुक्ती केली. राज्यातील पात्र फुटबॉल प्रशिक्षकांची संख्या वाढविण्याची जबाबदारीही मारियान यांच्यावर असेल.

‘‘मारियान यांची नियुक्ती करताना आनंद होत आहे. ते अनुभवसंपन्न असून त्याचा लाभ राज्यातील फुटबॉलला होईल. ते उच्च दर्जाचे प्रशिक्षक आहेत आणि आम्ही त्यांना आमच्या युवा फुटबॉल संरचनेचे पुनरुज्जीवन करणे, राज्य संघांच्या निवडीवर देखरेख करणे आणि प्रशिक्षक शिक्षणात मदत करण्याचे काम दिले आहे,’’ असे कायतान यांनी सांगितले.

संघटनेची आमसभा उद्या

जीएफएची वार्षिक आमसभा रविवारी (ता. ९) होणार आहे. यावेळी जीएफएचे अधिकृत संकेतस्थळ सुरू केले जाईल, तसेच बैठकीत मोसमाचे अंदाजपत्रकही निश्चित केले जाईल. आगामी मोसमापासून महिला लीग आणि प्रथम विभागीय फुटबॉल स्पर्धेचे प्रक्षेपण करण्यासाठी जीएफए प्रयत्नशील आहे.

‘‘मी जीएफए अध्यक्षाची भेट घेतली. संघटनेप्रती त्यांच्या दृष्टिकोनाने प्रभावित झालो. माझ्या राज्यासाठी परतफेड करण्याची चांगली संधी असल्याचे मला वाटते. गोव्याचे फुटबॉलमधील गतवैभव प्राप्त करण्यासाठी खूप काही करावे लागेल आणि ते साध्य करण्यासाठी मी कठोर परिश्रम घेईन.’’

- मारियान डायस, जीएफए तांत्रिक समन्वयक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT