Ravi Naik Says don’t kill Frog for meat
Ravi Naik Says don’t kill Frog for meat Dainik Gomantak

Ravi Naik On Frog : बेडकांच्या मागे लागू नका; चिकन खा, बोकड खा, कृषिमंत्र्यांचा गोयकारांना सल्ला

पर्यावरण वाचवण्यासाठी बेडकांचं रक्षण करण्याची गरज : मुख्यमंत्री डॉ. सावंत
Published on

Ravi Naik Says don’t kill Frog for meat : फोंड्याचे आमदार आणि कृषी मंत्री रवी नाईक नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी एक अजबगजब विधान केलं आहे ज्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

"आता पावसाळा सुरु झाला आहे त्यामुळे बेडकांचे (Frog) प्रमाण वाढणार आहे. लोकांनी बेडकांच्या पाठीमागे जाणे टाळावे, त्यांचे मास खाण्यासाठी शिकार टाळावी" असा सल्ला त्यांनी गोव्यातील जनतेला दिला आहे.

याबाबतचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. तसेच बेडकांची शिकार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा मंत्री नाईक यांनी यावेळी दिला.

Ravi Naik Says don’t kill Frog for meat
CM Pramod Sawant: राज्यात गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण देशात सर्वाधिक; मुख्यमंत्र्यांकडून गोवा पोलिसांचे कौतूक

कुठ्ठाळी येथे बाजार संकुल इमारतीतील पहिल्या मजल्यावर स्थापण्यात आलेल्या विभागीय कृषी कार्यालयाच्या उद्‍घाटनानंतर मंत्री रवी नाईक यांनी आज पत्रकारांशी बोलताना वक्तव्य केले. ते म्हणाले, "आता पावसाळा सुरु झाला आहे त्यामुळे बेडकांचे प्रमाण वाढणार आहे. बेडकांचे अनेक प्रकार आहेत. लोकांनी बेडूक मारणे टाळावे."

"बेडकाचे मांस खाऊ नये अन्यथा त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकतो. लोकांनी बेडकांचे मांस खाणे बंद करावे आणि कोंबडी किंवा मटण खायला सुरुवात करावी यात काहीही नाही. लोकांनी पावसाळ्यात बेडकांना मारू नये" असा सल्ला कृषी मंत्री रवी नाईक यांनी दिला आहे.

Ravi Naik Says don’t kill Frog for meat
गोव्यात बेडकांची शिकार? रेस्टॉरंटकडून मागणी होत असल्याची तक्रार, सामाजिक संघटनांनी व्यक्त केली चिंता

"पर्यावरण वाचवण्यासाठी बेडकांचं रक्षण करण्याची गरज आहे. शेतीसाठी बेडूक महत्वाचा आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्याचे काम बेडूक करतो. बेडकांची शिकार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. बेडूक खाण्याऐवजी चिकन खा" असा सल्ला यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी दिला.

काही दिवसांपूर्वी गोव्यात बेडकांच्या अवैध शिकारीबाबत सामाजिक संघटना गोवाकॅनच्या वतीने चिंता व्यक्त करण्यात आली होती. बेडकांची शिकार करण्याचे प्रमाण वाढल्याने याबाबत जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत गोवाकॅनच्या वतीने व्यक्त करण्यात आले होते.

वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत बेडकांना पकडणे, त्यांची हत्या आणि त्यांचा खाद्यपदार्थात वापर यावर बंदी घालण्यात आली आहे. असे गोवाकॅनचे समन्वयक रोनाल्ड मार्टीन यांनी हेराल्ड या इंग्रजी दैनिकाला माहिती देताना सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com