Bihar Crime: 'कोचिंगमध्ये प्रेम, हॉस्टेलमध्ये जवळीकता वाढली...'; अधिकारी होताच मुलाने दिला धोका

Bihar: 2022 मध्ये मुलाला सरकारी नोकरी लागली, तो अधिकारी झाला. मात्र, ग्रामविकास अधिकारी (आरडीओ) म्हणून निवड झाल्यावर त्याने मुलीशी लग्न करण्यास नकार दिला.
Bihar Crime
Bihar CrimeDainik Gomantak

Bihar Crime: बिहारमधून प्रेम, रिलेशन आणि फसवणुकीचे प्रकरण समोर आले आहे. राजधानी पाटणा येथे राहणाऱ्या एका मुलीचे तिच्यासोबत कोचिंगमध्ये शिकणाऱ्या मुलावर प्रेम जडले. प्रेम फुलल्यावर दोघांनी एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली.

यानंतर दोघेही मुलगा राहत असलेल्या वसतिगृहाच्या खोलीत आले. इथे 2022 मध्ये मुलाला सरकारी नोकरी लागली, तो अधिकारी झाला. मात्र, ग्रामविकास अधिकारी (आरडीओ) म्हणून निवड झाल्यावर त्याने मुलीशी लग्न करण्यास नकार दिला.

प्रियकराच्या आई-वडिलांनाही आरोपी करण्यात आले

पटनाच्या अशोक राजपथ येथील एका मुलीने बक्सर येथील एका मुलावर लग्नाच्या बहाण्याने लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. मुलगा ग्रामविकास अधिकारी आहे. याप्रकरणी मुलीने पीरबहोर पोलिस (Police) ठाण्यात लेखी तक्रार दिली असून, त्यानंतर पोलिसांनी मुलाविरुद्ध बलात्कार आणि इतर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मुलीने आरोपीच्या पालकांवरही आरोप केले आहेत.

Bihar Crime
Bihar Crime: जवानाने पत्नीसह दोन महिन्यांच्या तान्ह्या बाळाला जिवंत जाळले, कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का!

अधिकारी झाल्यानंतर फसवणूक

मुलीने (Girl) पोलिसांकडे दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे की, 'मुलगा पाटणा विद्यापीठाच्या मिंटो हॉस्टेलमध्ये राहत होता, तिथेच तो स्पर्धा परिक्षेची तयारी करत होता. यादरम्यान तो माझ्या घराजवळील कोचिंगमध्ये शिकायलाही यायचा. इथे तो मला भेटला. त्यानंतर आमच्यामध्ये आधी मैत्री झाली नंतर आम्ही एकमेंकावर प्रेम करु लागलो. यानंतर लग्नाच्या बहाण्याने त्याने माझे लैंगिक शोषण केले.'

Bihar Crime
Bihar Crime: धक्कादायक! 14 वर्षीय मुलीवर बलात्कार, पंचायतीच्या निर्णयानंतर वडिलांची पोलिसांकडे धाव

दुसरीकडे, 2022 मध्ये, मुलाने BPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्याची ग्रामविकास अधिकारी म्हणून निवड झाली. त्यानंतरही तो तिच्याशी लग्न करणार असल्याची चर्चा सुरुच होती. 9 मे 2023 रोजीही त्यांची भेट झाली. मात्र आता तो लग्नाला नकार देत आहे. माझ्या आई-वडिलांना पाहिजे तेवढा हुंडा तुझे आई-वडील देऊ शकणार नाहीत, असे मुलाने पीडितेला सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com