Ashes Ball-Change Controversy Dainik Gomantak
क्रीडा

Ashes Ball-Change Controversy: ऍशेसमध्ये चेंडू बदलण्यावरुन वाद, पाँटिंगने केली चौकशीची मागणी; ख्वाजा म्हणाला...

Manish Jadhav

Ashes Ball-Change Controversy: यंदाची ऍशेस मालिका वादाने संपली. ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात चेंडू बदलण्यावरुन वाद झाला. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी चेंडू बदलण्यावर प्रश्न उपस्थित केले. सलामीवीर उस्मान ख्वाजाने बदललेल्या चेंडूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, आम्ही ज्या चेंडूने खेळत होतो तो हा चेंडू नव्हता.

दरम्यान, सामना संपल्यानंतर मीडियाशी बोलताना उस्मान ख्वाजा म्हणाला की, 'मी थेट अंपायरकडे गेलो आणि त्यांना सांगितले की आम्ही ज्या चेंडूने खेळत होतो तसा हा चेंडू दिसत नाही. हा चेंडू बॅटवर जोरात आदळतो. मी प्रत्येक वेळी नव्या चेंडूवर फलंदाजीसाठी सलामीला येतो. तो पुढे म्हणाला की, 'काय होत आहे ते मला माहीत नाही, तुम्ही जुन्या चेंडूवरुन अगदी नवीन चेंडूवर गेलात.'

रिकी पाँटिंगने प्रश्न उपस्थित केला

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने (Ricky Ponting) या वादाच्या संदर्भात आयसीसीकडे चौकशीची मागणी केली आहे. बदललेल्या चेंडूचा फायदा इंग्लंडच्या गोलंदाजांना झाला, असे पॉन्टिंगचे मत आहे.

37व्या षटकाच्या पहिल्या चेंडूनंतर अंपायर जोएल विल्सन आणि कुमार धर्मसेना यांनी चेंडू बदलला. दुसऱ्या दिवशी दुपारी चेंडू बदलल्यानंतर केवळ 11 चेंडू टाकता आले. ऑस्ट्रेलियन फलंदाजांना जुन्या चेंडूच्या तुलनेत नवीन चेंडूने खेळणे कठीण झाले.

चौकशी करावी

स्काय स्पोर्ट्सवर बोलताना पॉन्टिंग म्हणाला की, 'माझी सर्वात मोठी चिंता ही आहे की चेंडू बदलण्यासाठी निवडलेल्या स्थितीत मोठी विसंगती होती. ते दोन बॉल्स तुम्ही पाहू शकता, जगात असा कोणताही पर्याय नाही.

मग तुम्ही त्याची कोणत्याही प्रकारे तुलना करु शकता. तुम्ही त्या बॉक्समध्ये पाहिल्यास, तिथे फारसे प्रिस्टिन कंडिशन चेंडू नव्हते. काही जुने चेंडू उचलले, अंपायर्संनी पाहिले आणि परत ठेवले.'

पाचव्या दिवशी सामन्याची स्थिती बदलली

ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या चौथ्या दिवशी 38 षटकात 135 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि ख्वाजा तूफानी फटकेबाजी करत होते. पण पाचव्या दिवशी सामन्याची स्थिती पूर्णपणे बदलली. ख्रिस वोक्सने बदललेल्या चेंडूने घातक गोलंदाजी केली.

42व्या षटकात त्याने डेव्हिड वॉर्नरची तर 44व्या षटकात उस्मान ख्वाजाची विकेट घेतली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या विकेट्स सातत्याने पडत गेल्या. 384 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यात ऑस्ट्रेलियाला अपयश आले आणि शेवटची कसोटी 49 धावांनी गमवावी लागली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: क्रिकेटच्या देवाचा मुलगा चमकला, कर्नाटक संघाचे कंबरडे मोडले; गोव्याला मिळवून दिला मोठा विजय

Hit and Run Case: पेडणे हिट अँड रन प्रकरणातील फरार ट्रकचालकाला अटक

Mumbai Goa Highway Accident: मालवणमधून कोल्हापूर - तुळजापूरला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात, 26 प्रवासी जखमी

Whirlwind at Arambol Beach: हरमल समुद्रकिनारी अचानक वावटळीची धडक; काही स्टॉल्सचे नुकसान

Goa Fishing: कर्नाटकातील मच्छीमारांची घुसखोरी, गोव्यातून होतोय तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT