Ashes 2023: ऍशेस मालिकेत 'या' 5 फलंदाजांनी सोडली छाप, उस्मान ख्वाजाने काढल्या सर्वाधिक धावा

Most Runs in Ashes 2023: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली.
Usman Khawaja
Usman KhawajaDainik Gomantak
Published on
Updated on

Most Runs in Ashes 2023: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. या मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या 2 तर इंग्लंडच्या 3 फलंदाजांनी आश्चर्यकारक कामगिरी केली. त्यात एकापेक्षा एक दिग्गजांची नावे आहेत. पहिले नाव ऑस्ट्रेलिया संघाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाचे आहे, ज्याने 2023 च्या ऍशेस मालिकेत सर्वाधिक 496 धावा केल्या आहेत.

दरम्यान, 2023 च्या ऍशेस मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप 5 फलंदाजांच्या यादीत इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्रॉली, स्टार फलंदाज जो रुट आणि कर्णधार बेन स्टोक्स यांच्या नावाचाही समावेश आहे.

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे, ज्याने 5 ऍशेस सामन्यांमध्ये एकूण 373 धावा केल्या आहेत.

Usman Khawaja
Ashes 2023: ब्रॉडला दिला गोड निरोप! ऑस्ट्रेलियाचं स्वप्न भंगलं, इंग्लंडने जिंकली 5वी कसोटी

2023 च्या ऍशेस मालिकेतील सर्वाधिक धावा करणारे 5 खेळाडू

1. उस्मान ख्वाजा

सामना -5

डाव - 10

धावा - 496

हाय स्कोर- 141

सरासरी - 49.60

2. जॅक क्रोली

सामना - 5

डाव - 9

धावा - 480

हाय स्कोर - 189

सरासरी - 53.33

3. जो रुट

सामना - 5

डाव - 9

धावा - 412

हाय स्कोर- 118

सरासरी - 51.50

Usman Khawaja
Ashes 2023: अँडरसनसाठी 41 वा वाढदिवस इमोशनल, जिगरी दोस्त ब्रॉडची सुटणार साथ

4. बेन स्टोक्स

सामना - 5

डाव - 9

धावा - 373

हाय स्कोर - 155

सरासरी 45.00

5. स्टीव्ह स्मिथ

सामना - 5

डाव - 10

धावा - 373

हाय स्कोर - 110

सरासरी - 37.30

Usman Khawaja
Ashes 2023: इंग्लंडच्या खेळाडूंनी एकमेकांची जर्सी का घातली? कारण जाणून तुम्हीही म्हणाल...

तसेच, ऍशेस मालिकेतील शेवटचा कसोटी सामना यजमान इंग्लंडने 49 धावांनी जिंकला होता. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या 5 कसोटी सामन्यांची ही मालिका 2-2 अशी बरोबरीत होती. पहिले 2 सामने ऑस्ट्रेलियाने (Australia) जिंकले होते, त्यानंतर तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने पुनरागमन करुन विजय मिळवला होता. चौथी कसोटी अनिर्णित राहिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com