Commonwealth Games 2026 Gymnast Accident Dainik Gomantak
क्रीडा

CWG 2026 मध्ये थरारक अपघात! हाय बारवरून थेट डोक्यावर कोसळला इंग्लंडचा खेळाडू; तातडीने रुग्णालयात दाखल VIDEO

Commonwealth Games 2026 Gymnast Accident: स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये एका जिम्नॅस्टिक स्पर्धेदरम्यान सर्वांनाच हादरवणारी घटना घडली.

Sameer Amunekar

स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये एका जिम्नॅस्टिक स्पर्धेदरम्यान सर्वांनाच हादरवणारी घटना घडली. इंग्लंडचा जिम्नॅस्ट गॅब्रिएल लँगटन पुरुषांच्या सांघिक अंतिम फेरीत हाय बारवरील कौशल्य सादर करत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो थेट डोके व मानेवर जमिनीवर कोसळला. हा प्रकार पाहून काही क्षण प्रेक्षक, खेळाडू आणि आयोजकही स्तब्ध झाले.

तातडीने वैद्यकीय मदत, रुग्णालयात हलवले

अपघातानंतर स्पर्धास्थळी उपस्थित असलेल्या वैद्यकीय पथकाने क्षणाचाही विलंब न लावता गॅब्रिएलची तपासणी सुरू केली. प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक तपासणीसाठी त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. अपघाताचे गांभीर्य लक्षात घेता त्याच्या डोक्याचा आणि मानेचा सखोल वैद्यकीय तपास करण्यात आला.

स्कॅनमध्ये गंभीर दुखापत नसल्याने दिलासा

रुग्णालयात विविध स्कॅन आणि वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्यानंतर गॅब्रिएल लँगटनला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नसल्याचे स्पष्ट झाले. इंग्लंडच्या जिम्नॅस्टिक संघानेही अधिकृत निवेदनाद्वारे त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली. आवश्यक निरीक्षणानंतर त्याला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार असल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे इंग्लंडच्या संघासह क्रीडाप्रेमींनी सुटकेचा निःश्वास सोडला.

शेवटच्या क्षणी मिळाली होती संघात संधी

विशेष म्हणजे गॅब्रिएल लँगटनचा कॉमनवेल्थ गेम्ससाठीच्या इंग्लंड संघात समावेश अखेरच्या क्षणी करण्यात आला होता. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता मॅक्स व्हिटलॉक दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडल्याने त्याच्या जागी लँगटनला संधी देण्यात आली होती. या संधीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याच्यासोबत हा दुर्दैवी अपघात घडला.

पदकतालिकेत इंग्लंड दुसऱ्या स्थानावर

कॉमनवेल्थ गेम्सच्या पहिल्या तीन दिवसांत इंग्लंडने दमदार कामगिरी करत एकूण 15 पदके जिंकली असून पदकतालिकेत दुसरे स्थान मिळवले आहे. ऑस्ट्रेलिया 12 सुवर्णांसह एकूण 23 पदकांसह अव्वल स्थानावर कायम आहे.

भारताकडून पदकसंख्या वाढण्याची अपेक्षा

भारताने स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात एक कांस्यपदक पटकावत पदकतालिकेत दहावे स्थान मिळवले आहे. मात्र, पुढील दिवसांत नेमबाजी, कुस्ती, बॅडमिंटन, बॉक्सिंग आणि इतर स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी दिवसांत भारताच्या पदकसंख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.

ग्लासगोतील या अपघाताने खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सुदैवाने गॅब्रिएल लँगटन गंभीर दुखापतीपासून बचावला असला, तरी या घटनेने जिम्नॅस्टिकसारख्या धाडसी क्रीडा प्रकारांमध्ये सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa E Tender Process: राज्यातील काही ग्रामपंचायतींकडून ई-निविदा नियम धाब्यावर; पाच लाखांवरील टेंडर पद्धतीत गैरव्यवहार

Dharmendra Pradhan Resignation: लढा अजूनही कायम! दिल्लीतील आंदोलनाच्या यशानंतर कार्यकर्त्यांचा पणजीत आनंदोत्सव

Goa Road Accidents: गोव्यात दरमहा 23 जणांचा होतोय अपघाती मृत्यू ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची लोकसभेत माहिती, दररोज 8 रस्ते अपघातांची नोंद

VIDEO: फलंदाजीत अपयश, पण गोलंदाजीत सुपरहिट! अभिषेक शर्माने रचला इतिहास; टी-20 क्रिकेटमध्ये 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

वेर्ण्यात भीषण दुर्घटना! धावत्या मिनी टेम्पोवर कोसळली उच्चदाब वीजवाहिनी; 30 वर्षीय क्लिनरचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT