Goa Road Accidents: गोव्यात दरमहा 23 जणांचा होतोय अपघाती मृत्यू ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची लोकसभेत माहिती, दररोज 8 रस्ते अपघातांची नोंद

Goa Accident Deaths: गोव्‍यासह देशभरातील वाढते अपघात आणि त्‍यातील मृतांची संख्‍या कमी करण्‍यासाठी केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना राबविण्‍यात येत आहेत.
Goa Accident Deaths
Goa Road AccidentsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यात दिवसाला सरासरी सात ते आठ अपघातांची नोंद होत असून, महिन्‍याला सरासरी २३ जणांचा अपघातांत मृत्‍यू होत असल्‍याचे केंद्रीय रस्‍ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेतील लेखी प्रश्‍‍नाला दिलेल्‍या उत्तरातील आकडेवारीतून समोर आले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेतील लेखी प्रश्‍‍नाला दिलेल्‍या उत्तरानुसार, गोव्यात २०२२ ते २०२५ या काळात एकूण १०,९१५ अपघात घडले असून, त्‍यात तब्बल १,१२० जणांचा मृत्‍यू झाला आहे. यातून राज्‍यात दरदिवशी सात ते आठ अपघात घडत असून, त्‍यात महिन्‍याला सरासरी २३ जणांचा मृत्‍यू होत असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.

Goa Accident Deaths
Goa Accident: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! रेडी घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारचा अपघात; एकजण गंभीर जखमी

गोव्‍यासह देशभरातील वाढते अपघात आणि त्‍यातील मृतांची संख्‍या कमी करण्‍यासाठी केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना राबविण्‍यात येत आहेत. रस्ते सुरक्षेच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षण, अभियांत्रिकी, अंमलबजावणी आपत्कालीन सेवा याबाबत बहुआयामी धोरण आखले आहे. त्यानुसार देशात रस्ते सुरक्षेसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत, असे मंत्री गडकरी यांनी उत्तरात म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com