Sangeeta Kumari Dainik gomantak
क्रीडा

CWG 2022: आर्थिक अडचणींमुळे हॉकीपटू संगीताचे कुटुंब राहते कच्चा घरात

Commonwealth Games 2022: निक्की परधान, सलीमा टेटे आणि संगीता कुमारी यांच्यासह भारतीय महिला संघातील तीन खेळाडू झारखंडमधून आले आहेत.

दैनिक गोमन्तक

Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ गेम्स 2022 बर्मिंगहॅममध्ये सुरू झाले आहेत. संगीता कुमारीने (Sangeeta Kumari) भारतीय महिला हॉकी संघात खेळण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप संघर्ष केला. संगीता आता भारतीय संघाची निळी जर्सी परिधान करण्यासाठी सज्ज झाली आहे. कारण ती बर्मिंगहॅम, लंडन येथे उद्घाटन राष्ट्रकुल खेळांमध्ये (CWG 2022) देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. कुटुंबाच्या कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे तिच्या घरात टिव्ही नाही. ती मूळची झारखंडमधील सिमडेगा जिल्ह्यातील करंगागुडी गावची आहे. (Indian Women's Hockey Team)

झारखंडचे हॉकीचे अध्यक्ष भोलानाथ सिंग यांना संगीताच्या आर्थिक परिस्थितीबद्दल कळल्यावर त्यांनी गुरुवारी रांचीहून संगीताच्या घरी एक एलईडी टीव्ही पाठवला जेणेकरून खेळाडूचे कुटुंब आणि त्यांच्या गावातील लोकांना राष्ट्रकुल खेळ थेट पाहता येईल.

निक्की परधान, सलीमा टेटे आणि संगीता कुमारी यांच्यासह भारतीय महिला संघातील तीन खेळाडू झारखंडमधून आले आहेत. तिन्ही खेळाडूंची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. या तिन्ही खेळाडूंनी आपल्या मेहनतीने आणि सरावाने आज भारतीय हॉकी संघात स्थान निर्माण केले आहे. या तीन खेळाडूंपैकी निक्की प्रधान आणि सलीमा टेटे याही भारतीय महिला हॉकी संघाचा भाग होत्या, ज्यांनी जपानमधील टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये हॉकीच्या मैदानावर चमकदार कामगिरी केली होती.

संगीताला विविध आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भारतीय महिला हॉकी संघाकडून खेळण्याची संधी देण्यात आली आहे. ती प्रथमच CWG 2022 च्या उद्घाटनात देशाचे प्रतिनिधित्व करत आहे. झारखंडच्या बंडखोरीग्रस्त सिमडेगा जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 35 किमी अंतरावर असलेल्या केरसाई ब्लॉकच्या करंगागुडी गावात राहणाऱ्या संगीता कुमारीचे कुटुंब अजूनही कच्चा घरात राहते.

तिच्या आई-वडिलांशिवाय ती पाच बहिणी आणि एका भावासह राहते. संगीताचे आई-वडील मजुरी किंवा शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. तसेच काही महिन्यांपूर्वी संगीताला रेल्वेत नोकरी मिळाली त्यामुळे कुटूंबाला आर्थिक आधार मिळाला. त्यातून ती आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. जेव्हा संगीताला रेल्वेतून पहिला पगार मिळाला तेव्हा तिने आपल्या गावातील मुलांना हॉकीचा चेंडू भेट दिले होते.

संगीताचे वडील रणजीत मांझी यांनी सांगितले की, मुलीला नेहमीच हॉकीची आवड होती. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असूनही त्यांनी मुलिचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कष्ट केले. आपल्या गावातील मोठ्या संख्येने मुली तसेच मोठ्या बहिणी हॉकी खेळत असल्याचे पाहून तिनेही हट्ट धरला आणि बांबूच्या काठीने प्रथमच हॉकी खेळण्यास सुरुवात केली.

त्यानंतर काही महिन्यांनी तिला सिडेगामध्ये खेळण्याची संधी मिळाली. तेथे तिने प्रथमच हॉकी स्टिकसह चेंडू खेळला. तेथे चमकदार कामगिरी केली, त्यामुळे तिला राज्यस्तरावर खेळण्याची संधी मिळाली. तेथे संगिताला योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळाले. आणि तिथूनच संगिताने मोठी भरारी घेतली. 2016 मध्ये, संगीता पहिल्यांदा भारतीय हॉकी संघात सामील झाली.

त्याच वर्षी तिने स्पेनमध्ये झालेल्या 5 नेशन ज्युनियर महिला स्पर्धेत भाग घेतला. 2016 मध्ये, थायलंडमध्ये झालेल्या अंडर-18 आशिया चषक स्पर्धेत तिने कांस्यपदक जिंकले. 18 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत भारताने एकूण 14 गोल केले, त्यापैकी आठ एकट्या संगीताने केले. तिचा उत्कृष्ट फॉर्म पाहून तिची राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय महिला संघात निवड झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chandra Grahan: 2025 मधलं भारतातलं पहिलं आणि अंतिम चंद्रग्रहण; कधी आणि कुठे दिसेल जाणून घ्या..

Green Cess Goa: धक्कादायक! 178 कोटींचा हरित कर थकीत; जिंदाल, झुआरी, अदानी, वेदान्‍तासह 26 कंपन्‍या थकबाकीदार

Rashi Bhavishya 28 July 2025: खर्च नियंत्रीत ठेवा, आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी ठेवा; कुटुंबात आनंदाचे क्षण येतील

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

SCROLL FOR NEXT