Hanuman Chalisa Video: ऐतिहासिक विक्रम! 'श्री हनुमान चालीसा' 5 अब्ज व्ह्यूज ओलांडणारा भारतातील पहिला व्हिडिओ; जागतिक यादीत समावेश

Hanuman Chalisa 5 Billion Views: भारतातील डिजिटल कंटेंटच्या इतिहासात एका 14 वर्षे जुन्या भक्तीपर व्हिडिओने अभूतपूर्व विक्रम प्रस्थापित केला.
Hanuman Chalisa 5 Billion Views
Hanuman ChalisaDainik Gomantak
Published on
Updated on

Hanuman Chalisa 5 Billion Views: भारतातील डिजिटल कंटेंटच्या इतिहासात एका 14 वर्षे जुन्या भक्तीपर व्हिडिओने अभूतपूर्व रेकॉर्ड प्रस्थापित केला. 'टी-सिरीज' निर्मित 'श्री हनुमान चालीसा' या व्हिडिओने यूट्यूबवर 5 अब्ज व्ह्यूजचा टप्पा पार केला. अशाप्रकारे हा टप्पा गाठणारा हा भारतातील एकमेव व्हिडिओ आहे. इतर कोणतेही भारतीय व्हिडिओ 2 अब्ज व्ह्यूजच्या आसपासही पोहोचू शकले नाहीत, त्यामुळे 'श्री हनुमान चालीसा' हा देशातील सर्वाधिक पाहिला गेलेला व्हिडिओ बनला.

दिवंगत गुलशन कुमार यांची देणगी

दरम्यान, हा भक्तीपर व्हिडिओ 10 मे 2011 रोजी यूट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये टी-सिरीजचे संस्थापक दिवंगत गुलशन कुमार आहेत, तर या चालीसेला प्रसिद्ध गायक हरिहरन यांनी आपला भावपूर्ण आवाज दिला. तर ललित सेन यांनी या चालीसेला संगीतबद्ध केले. 14 वर्षांच्या काळात या व्हिडिओने 5,006,713,956 (5 अब्ज 60 लाखांहून अधिक) व्ह्यूजचा आकडा पार केला. यामुळे हा व्हिडिओ केवळ भारतातच नाहीतर यूट्यूबच्या जागतिक सर्वाधिक पाहिलेल्या व्हिडिओंच्या टॉप 10 यादीतही सामील झाला.

Hanuman Chalisa 5 Billion Views
Modi Goa Visit: गोव्यात उभारते आहे 77 फूट उंच 'श्रीराम मूर्ती'! PM मोदींच्‍या हस्ते होणार अनावरण; पर्तगाळ मठात येणार हजारो भाविक

गुलशन कुमार यांच्या दृष्टिकोनाचे यश

या ऐतिहासिक विक्रमाबद्दल टी-सिरीजचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, "हनुमान चालीसाचे करोडो लोकांच्या, तसेच माझ्या हृदयात एक विशेष स्थान आहे. माझे वडील, श्री गुलशन कुमार जी यांनी अध्यात्मिक संगीत प्रत्येक घराघरात पोहोचवण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. हा 5 अब्ज व्ह्यूजचा टप्पा त्यांच्या त्याच दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे. 5 अब्ज व्ह्यूजचा टप्पा ओलांडणे आणि यूट्यूबच्या जागतिक टॉप 10 व्हिडिओमध्ये स्थान मिळवणे हे केवळ डिजिटल यश नाहीतर हे या देशातील लोकांच्या अढळ भक्तीचे प्रतीक आहे."

Hanuman Chalisa 5 Billion Views
PM Modi Celebrates Diwali: भर समुद्रात देशभक्तीचा उत्‍साह, पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिवाळी नौदलाच्‍या जवानांसमवेत

इतर भारतीय व्हिडिओ खूप मागे

'श्री हनुमान चालीसा' ने गाठलेल्या या आकड्याच्या जवळपास कोणताही भारतीय व्हिडिओ पोहोचू शकलेला नाही. सर्वात जास्त पाहिलेल्या भारतीय व्हिडिओंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पंजाबी गाणे 'लेहेंगा' आहे, ज्याचे व्ह्यूज जवळपास 1.8 अब्ज आहेत. त्यानंतर हरियाणवी गाणे '52 गज का दामन' आणि तमिळ गाणे 'रौडी बेबी' प्रत्येकी 1.7 अब्ज व्ह्यूजसह तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. याशिवाय 'जरुरी था', 'वास्ते', 'लौंग लाची', 'लुट गये', 'दिलबर' आणि 'बम बम बोले' यांसारखी लोकप्रिय गाणीही पाहिलेल्या व्हिडिओंच्या यादीत आहेत, परंतु यापैकी कोणीही 2 अब्ज व्ह्यूजचा टप्पा ओलांडू शकलेले नाही.

Hanuman Chalisa 5 Billion Views
PM Modi Celebrates Diwali: "INS विक्रांतने पाकिस्तानची झोप उडवली", PM मोदींची दिवाळी गोव्यात; नौदलासोबत साजरा केला जल्लोष

जागतिक स्तरावर मिळवले स्थान

जागतिक स्तरावर यूट्यूब व्ह्यूजच्या यादीत मुलांसाठीचे व्हिडिओ (Baby Shark Dance - 16.38 अब्ज), 'डेस्पासिटो' (8.85 अब्ज), 'व्हील्स ऑन द बस' (8.16 अब्ज) यांसारख्या व्हिडिओंनी आघाडी घेतली. या जागतिक दिग्गजांच्या यादीत 'श्री हनुमान चालीसा'ने स्थान मिळवून भारताच्या अध्यात्मिक कंटेंटची ताकद जगाला दाखवून दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com