Syed Mushtaq Ali Trophy: सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत गोव्याचा पहिल्या सामना उत्तर प्रदेशशी; रणजीच्या अपयशानंतर टी-20 मध्ये कामगिरी सुधारण्याचे आव्हान!

Goa vs Uttar Pradesh Match: गोव्याच्या टी-२० संघाचे नेतृत्व सुयश प्रभुदेसाई करत असून संघातील अष्टपैलू खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष असेल.
Syed Mushtaq Ali Trophy T20 Cricket Tournament
Syed Mushtaq Ali Trophy T20 Cricket TournamentCanva
Published on
Updated on

पणजी: सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेतील गोव्याची मोहीम बुधवारपासून (ता. २६) सुरू होत आहे. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत ‘रेड बॉल’ने खेळल्यानंतर आता ‘व्हाईट बॉल’ क्रिकेटमध्ये कसोटी लागेल. एलिट ब गटातील सर्व सामने कोलकाता येथे खेळले जातील.

गोव्याच्या (Goa) टी-२० संघाचे नेतृत्व सुयश प्रभुदेसाई करत असून संघातील अष्टपैलू खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष असेल. रणजी करंडक स्पर्धेतील मागील दोन पराभवांच्या पार्श्वभूमीवर गोव्याला टी-२० स्पर्धेत कामगिरी सुधारण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल. गटात मातब्बर प्रतिस्पर्धी असल्याने कामगिरी उंचवावीच लागेल.

Syed Mushtaq Ali Trophy T20 Cricket Tournament
Syed Mushtaq Ali Trophy: अखेरच्या सामन्यात गोव्याचा झंझावात! अष्टपैलू कामगिरीवर नागालँडला नमवले, फेलिक्सने नोंदवली विक्रमी हॅटट्रिक

गतमोसमात (२०२४-२५) टी-२० स्पर्धेत गोव्याची कामगिरी खास नव्हती. सहा सामन्यांत चार पराभव पत्करावे लागले होते, तर फक्त दोन विजय नोंदविले होते. स्पर्धेच्या एलिट ब गटात २६ रोजी उत्तर प्रदेशविरुद्ध (Uttar Pradesh) खेळल्यानंतर गोव्याचा संघ २८ नोव्हेंबर रोजी चंडीगडविरुद्ध, ३० नोव्हेंबर रोजी हैदराबादविरुद्ध, २ डिसेंबरला मध्य प्रदेशविरुद्ध, ४ डिसेंबरला बिहारविरुद्ध ६ डिसेंबरला जम्मू-काश्मीरविरुद्ध, तर ८ डिसेंबरला महाराष्ट्राविरुद्ध सामना होईल.

Syed Mushtaq Ali Trophy T20 Cricket Tournament
Syed Mushtaq Ali Trophy: गोव्याचं 'सुयश', रोमहर्षक T 20 सामन्यात महाराष्ट्रावर तीन चेंडू राखून विजय

गोव्याचा टी-२० संघ असा ः सुयश प्रभुदेसाई (कर्णधार), अभिनव तेजराणा, ईशान गडेकर, दीपराज गावकर, दर्शन मिसाळ, मोहित रेडकर, शुभम तारी, कश्यप बखले, राजशेखर हरिकांत, स्नेहल कवठणकर, अमूल्य पांड्रेकर, वासुकी कौशिक, अर्जुन तेंडुलकर, ललित यादव, फेलिक्स आलेमाव, विकास सिंग, हेरंब परब.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com