Commonwealth: राष्ट्रकुल स्पर्धेत हे 5 खेळाडू भारताला मिळवून देऊ शकतात 'गोल्ड मेडल'

Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 आजपासून (28 जुलै) युनायटेड किंगडममध्ये सुरु होत आहे.
Pv Sindhu
Pv Sindhu Dainik Gomantak

Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 आजपासून (28 जुलै) युनायटेड किंगडममध्ये सुरु होत आहे. ते 8 ऑगस्ट रोजी संपणार आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत भारत नेहमीच चांगली कामगिरी करत आला आहे. गोल्ड कोस्ट 2018 गेम्समध्ये भारताने तिसरे स्थान पटकावले होते. यावेळी भारतातील 215 खेळाडूंच्या संघाने या स्पर्धेत हजेरी लावली आहे. यामध्ये असे पाच खेळाडू आहेत, जे भारतासाठी सुवर्णपदक मिळवून देऊ शकतात. याआधीही या खेळाडूंनी भारताचे नाव उंचावले आहे. जाणून घेऊया या खेळाडूंबद्दल...

1. रवी दहिया

24 वर्षीय रवी दहिया बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये सुवर्णपदक जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे. 24 वर्षीय रवी टोकियो ऑलिम्पिकपासून (Tokyo Olympics) उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे, जिथे त्याने रौप्य पदक जिंकले. तो पहिल्यांदाच राष्ट्रकुल खेळायला जाणार असून त्याला पदक जिंकण्याची इच्छा आहे. कुस्तीपटू रवी दहिया 57 किलो गटात खेळणार आहे. रवी दहियाचे वैशिष्टय़ म्हणजे तो आपल्या विरोधकांना युक्तीने चितपट करु शकतो.

Pv Sindhu
Commonwealth Games 2022: भारतीय बॉक्सर्स मारणार 'गोल्ड पंच', 30 जुलैला रंगणार सामने

2. Lovlina Borgohain-लवलीना बोरगोहेन

गेल्या दोन दशकांत मेरी कोमने (Mary Kom) आपल्या कामगिरीने सर्वांची मने जिंकली, मात्र टोकियो ऑलिम्पिकमध्ये लवलीना बोरगोहेनने कांस्यपदक जिंकल्यानंतर चित्र बदलले. लवलीना ही भारतीय बॉक्सिंगची नवी ओळख बनली आहे. या 24 वर्षीय प्रतिभावान खेळाडूने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या शेवटच्या आवृत्तीत भाग घेतला होता, परंतु तिथे पदक जिंकण्यात ती अपयशी ठरली होती. टोकियो ऑलिम्पिकनंतर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही तिची निराशाजनक कामगिरी होती, जिथे तिला उपउपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला.

3. PV Sindhu-पीवी सिंधू

भारतीय बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू (PV Sindhu) जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. सध्या ती जगातील सातव्या क्रमांकाची खेळाडू आहे. सिंधू उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. नुकतेच तिने सिंगापूर ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताला (India) दोन पदके जिंकून देणारी ती एकमेव महिला खेळाडू आहे. 2016 च्या ऑलिम्पिकमध्ये तिने रौप्य पदक आणि 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले होते. सुपरहिट सिंधूने कॉमनवेल्थमध्येही आपले 100 टक्के दिले तर सुवर्णपदक निश्चित आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत चीन आणि जपानचे खेळाडू सहभागी होत नसल्याने सिंधूचा मार्ग सोपा वाटतो.

Pv Sindhu
Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय तुकडी जाहीर, 215 खेळाडू जाणार बर्मिंगहॅमला

4. Mirabai Chanu-मीराबाई चानू

टोकियो ऑलिम्पिकची रौप्यपदक विजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची प्रबळ दावेदार आहे. गेल्या वेळी मीराबाई चानूने सुवर्णपदक जिंकले होते. ती तिच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा खूप पुढे असल्यामुळे तिच्या वजनी गटात प्रबळ दावेदार आहे. अशा स्थितीत भारतीय संघाला तिच्याकडून सुवर्णपदकाचीच आशा आहे.

5 Manika Batra-मनिक बत्रा

मनिका बत्रा सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून टेबल टेनिसमध्ये भारतीय संघ सुवर्णपदक जिंकेल अशी अपेक्षा आहे. मनिका बत्राने गोल्ड गस्टमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये दोन सुवर्णपदकांसह चार पदके जिंकली. 27 वर्षीय मनिका बत्रा सध्या टेबल टेनिसमध्ये भारताची अव्वल खेळाडू आहे. एकेरीमध्ये ती 41 व्या क्रमांकावर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com