Goa Sports : CM Cup competition starts from 30th October Dainik Gomantak
क्रीडा

मुख्यमंत्री चषक स्पर्धेला 30 ऑक्टोंबर पासून सुरवात

क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा समावेश : 1 लाख युवक होणार सहभागी

दैनिक गोमन्तक

Panjim : खास प्रतिनिधी भाजपच्या BjP युवा मोर्चाच्यावतीने राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात 30 ऑक्टोंबर ते 13 डिसेंबर या काळात मुख्यमंत्री चषक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष समीर मांद्रेकर यांनी दिली आहे . पणजीच्या पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते दामू नाईक, अखिल पर्रीकर उपस्थित होते.

या स्पर्धांमध्ये क्रीडा (Goa Sports) आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा सहभाग असेल. मुख्यमंत्री चषक क्रीडा स्पर्धांमध्ये क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, बॅडमिंटन, कॅरम, पॉवर लिफ्टींग या क्रीडा स्पर्धांचा समावेश आहे. तसेच सांस्कृतिक स्पर्धांमध्ये समूह नृत्य, घुमट आरती, फुगडी, गायन (एकल), चित्रकला, रांगोळी यांचा समावेश असल्याचे श्री मांद्रेकर यांनी सांगितले.

राज्यातील सर्व 40 ही मतदारसंघात याचे आयोजन केलं जाणार असून सुमारे 520 ठिकाणी या स्पर्धा होणार आहेत. तसेच यात राज्यातील तब्बल १ लाख युवक सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

स्पर्धेची नोंदणी उद्या पासून सुरू होणार असून 20 ऑक्टोबर पर्यंत ती चालणार आहे. 21 ते 29 पर्यंत स्पर्धांची पूर्व तयारी होईल. आणि सर्व स्पर्धा प्रत्यक्षात 30 ऑक्टोबर ते 13 डिसेंबर या काळात होतील. स्पर्धेत भाग घेण्यासाठी सर्व मतदरसंघातील महत्त्वाच्या ठिकाणी नोंदणी केली जाईल. यासाठी आमचे कार्यकर्ते तैनात असतील. तसेच इच्छुक युवक - युवती www.22in22.in येथे लॉगिन करून आपली नाव नोदणी करू शकतात. राज्यातील जास्तीत जास्त युवा - युवतींनी या स्पर्धांमध्ये भाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कोरोना महामारीचा फटका सर्व घटकांना बसला. तसा तो क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रालाही बसला. राज्य सरकारने पहिल्या डोसचे कोरोनाचे 100 टक्के लसीकरण पूर्ण केले आहे. आता दुसरा डोस घेतलेल्यांची संख्याही 60 टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे. तसेच राज्यातील बहुतांश व्यवहार सुरू झाले असून पर्यटनही सुरू झाले आहे. म्हणूनच राज्यातील खेळाडू आणि कलाकारांना प्रोत्साहान देण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रवक्ते दामू नाईक यांनी दिली. स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा स्व मनोहर पर्रीकर यांच्या जयंतीदिनी 13 डिसेंबर रोजी होणार आहे .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT