I-League Football Dainik Gomantak
क्रीडा

I-League Football Tournament: चर्चिल ब्रदर्सची गाडी अखेर रुळावर; नेरोका एफसीविरुद्ध नोंदवला मोठ्या फरकाने विजय!

I-League Football Tournament: आय-लीग फुटबॉल स्पर्धेत लागोपाठ दोन सामने गमावलेल्या चर्चिल ब्रदर्सची गाडी रविवारी विजयासह रुळावर आली.

Manish Jadhav

I-League Football Tournament: आय-लीग फुटबॉल स्पर्धेत लागोपाठ दोन सामने गमावलेल्या चर्चिल ब्रदर्सची गाडी रविवारी विजयासह रुळावर आली. वास्को येथील टिळक मैदानावर त्यांनी मणिपूरच्या नेरोका एफसीवर 4-1 फरकाने शानदार विजय नोंदवला. सामन्याच्या पहिल्या अर्ध्या तासातील खेळात तीन गोलची आघाडी घेतलेल्या चर्चिल ब्रदर्सला रोखणे इंफाळ येथील संघाला अवघड ठरले.

दरम्यान, फैझल अली याने अनुक्रमे 9व्या आणि 15व्या मिनिटास गोल केल्यानंतर 32व्या मिनिटास स्टेन्डली फर्नांडिस याने माजी विजेत्यांची स्थिती भक्कम केली. 47व्या मिनिटास अन्सुमाना क्रोमा याने पाहुण्या संघाची पिछाडी कमी केली, मात्र नंतर त्यांना चर्चिल ब्रदर्सची आघाडी भेदणे शक्य झाले नाही.

तसेच, रिकार्डो डिचियारा याने 90+4 व्याने मिनिटास संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल केला. चर्चिल ब्रदर्सचा हा नऊ सामन्यांतील तिसरा विजय ठरला. अन्य दोन बरोबरी व चार पराभवांसह त्यांचे आता 11 गुण झाले आहेत. नेरोका एफसीला सहावा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे नऊ लढतीनंतर त्यांचे सात गुण कायम राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT