ISL Football Dainik Gomantak
क्रीडा

ISL Football: चेन्नईयीनने बंगळूरला रोखले

चेन्नईयीन एफसीने बंगळूर एफसीला गोलबरोबरीत रोखले

दैनिक गोमन्तक

चेन्नई: सामन्यातील अखेरची आठ मिनिटे दहा खेळाडूंसह खेळूनही इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत चेन्नईयीन एफसीने बंगळूर एफसी संघाला 1-1असे गोलबरोबरीत रोखले आणि प्रत्येकी एक गुण विभागून घेतला.

(Chennaiyin FC Bengaluru FC match tied in ISL Football Tournament)

चेन्नईयीनचा गोलरक्षक देबजित मजुमदार याला 82 व्या मिनिटास रेड कार्ड दाखविण्यात आले, त्यामुळे यजमान संघाचा एक खेळाडू कमी झाला. बंगळूरच्या रॉय कृष्णा याला धोकादायकरीत्या अडथळा आणल्याबद्दल देबजितला शिक्षेस सामोरे जावे लागले.

सामन्यातील दोन्ही गोल पूर्वार्धाती खेळात झाले. फिजी देशाचा आंतरराष्ट्रीय आघाडीपटू रॉय कृष्णा याने सामन्याच्या चौथ्याच मिनिटास बंगळूरला आघाडी मिळवून दिली. त्याचा स्पर्धेतील एकंदरीत 37 वा गोल ठरला. नंतर पूर्वार्धाच्या इंज्युरी टाईममध्ये प्रशांत करुथादाथुनी याच्या गोलमुळे चेन्नईयीनने बरोबरी साधली.

दोन्ही संघांनी आता प्रत्येकी दोन सामने खेळल्यानंतर विजय व बरोबरी अशा कामगिरीसह प्रत्येकी चार गुणांची कमाई केली आहे. ते अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. स्पर्धेत शनिवारी (ता. 15) मुंबई सिटी व ओडिशा एफसी यांच्यात लढत होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

Goa Live News: 8 दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास खड्ड्यात 200 काजुची रोपे लावण्याचा ग्रामस्थाचा इशारा

Goan Architecture: ‘नीज-गोंयकारांनो’ जागे व्हा! लादलेल्या प्रोजेक्ट्समुळे पारंपरिक स्थापत्यकलेचा ‘सत्यानाश’ होतोय

Shivaji Maharaj: अफझल खान मारला गेला, त्याचा मुलगा फाजल कराडच्या मशिदीच्या मिनारांमध्ये लपला; प्रतापगडची लढाई

SCROLL FOR NEXT