U-17 WC: विजयामुळे नायजेरियाचे आव्हान कायम

17 वर्षांखालील महिला विश्वकरंडक स्पर्धेत न्यूझीलंडचा सलग दुसरा पराभव
17 Women's Football World Cup
17 Women's Football World CupDainik Gomantak

पणजी: नायजेरियाने न्यूझीलंडवर 4-0 फरकाने दणदणीत विजय नोंदवत फिफा 17 वर्षांखालील महिला विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. त्यांचा हा ‘ब’ गटातील पहिला विजय ठरला, तर किवींना सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे त्यांचे परतीचे तिकीट निश्चित झाले.

(Nigeria team 1st victory in the Under 17 Women's Football World Cup tournament )

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या लढतीत नायजेरियाने पूर्वार्धात दोन गोलची आघाडी घेतली होती. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात आघाडी घेऊनही नायजेरियास जर्मनीकडून पराभव पत्करावा लागला होता, मात्र यावेळी त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला डोके वर काढण्याची संधी दिली नाही. 16व्या मिनिटास आघाडी फळीतील अमिना बेलो हिने गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली. नंतर 34 व्या मिनिटास मिरॅकल उसानी हिने संघाची आघाडी भक्कम केली. मिरॅकलचा हा स्पर्धेतील दुसरा गोल ठरला.

17 Women's Football World Cup
T20 World Cup: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात या दिग्गजाचे स्थान निश्चित, भारत स्वबळावर जिंकणार!

सामन्याच्या शेवटच्या 15 मिनिटांच्या खेळात नायजेरियाच्या खात्यात आणखी दोन गोलची भर पडली. तैवो अफोलाबी 75 व्या मिनिटास संघाची आघाडी 3-0 अशी वाढवल्यानंतर इंज्युरी टाईममध्ये 90+ 5 व्या मिनिटास बदली खेळाडू एदिदिओंग एतिम हिने ‘सुपर ईगल्स’च्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल नोंदविला. दोन सामने खेळल्यानंतर नायजेरियाचे आता तीन गुण झाले आहेत.

17 Women's Football World Cup
Senior Womens T-20: दोन पराभवानंतर अखेर गोव्याच्या महिला विजयी

स्पर्धेतील पहिल्या सामन्यात चिलीविरुद्ध पराभव पत्करलेल्या न्यूझीलंडचा गटसाखळीतील शेवटचा सामना येत्या सोमवारी (ता. 17) रोजी जर्मनीविरुद्ध फातोर्डा येथे होईल. सोमवारीच नायजेरिया आणि चिली यांच्यातील शेवटचा साखळी सामना भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर खेळला जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com