MS Dhoni and Ravindra Jadeja Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023 Champion: जड्डूचा विजयी चौकार अन् थालानं घेतलं कडेवर! पाहा CSK चे विनिंग मोमेंट्स

चेन्नई सुपर किंग्सने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर धोनीने जडेजाला उचलून घेतले होते.

Pranali Kodre

Chennai Super Kings Celebration After IPL 2023 Title Win: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेचे विजेतेपद चेन्नई सुपर किंग्सने जिंकले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्याच चेन्नईने गुजरात टायटन्सला 5 विकेट्सने पराभूत केले.

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ससमोर पावसाच्या अडथळ्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार १५ षटकात 171 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना अखेरच्या दोन चेंडूत चेन्नईला 10 धावांची गरज होती.

यावेळी चेन्नईकडून रविंद्र जडेजा फलंदाजी करत होता. तसेच गोलंदाजी गुजरातकडून मोहित शर्मा करत होता. जडेजाने या दबावाच्या परिस्थितीतही षटकार आणि मग विजयी चौकार मारला. यासह चेन्नईने हा सामना जिंकत पाचव्यांदा आयपीएल विजेतेपदावर नाव कोरले.

जडेजाने विजयी चौकार मारल्यानंतर मात्र चेन्नईच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले होते. जडेजाने चौकार मारल्यानंतर तो बॅट उंचावत मैदानात धावत होता. त्याचवेळी चेन्नई संघातील सदस्यांनी मैदानात धाव घेतली.

यावेळी मात्र एमएस धोनी डगआऊटमध्येच टाळ्या वाजवत होता. यावेळी चेन्नईतील अन्य सदस्यांनी त्याची गळाभेट घेतली. त्यानंतर धोनीनेही सेलिब्रेशनमध्ये सामील झाला. याचवेळी त्याने आनंदाने जडेजालाला कडेवरही घेतले. यावेळी चेन्नई संघातील सर्वच जण खूप आनंदाने सेलिब्रेशन करत होते. चेन्नईच्या या सेलिब्रेशनचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

चेन्नईने पाचव्यांदा जिंकले विजेतेपद

या सामन्यात गुजरातने वृद्धिमान साहा (54) आणि साई सुदर्शन (96) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकात 4 बाद 214 धावा केल्या होत्या. पण नंतर चेन्नईच्या फलंदाजीवेळी सुरुवातीलाच पाऊस आल्याने डकवर्थ लुईसनुसार चेन्नईसमोर 15 षटकात 171 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते.

चेन्नईकडून रविंद्र जडेजा 6 चेंडूत 15 धावांवर नाबाद राहिला. तसेच शिवम दुबे 21 चेंडूत 32 धावांवर नाबाद राहिला. याशिवाय चेन्नईकडून डेव्हॉन कॉनवेने सर्वाधिक 47 धावा केल्या. तसेच ऋतुराज गायकवाड (26), अजिंक्य रहाणे (27) आणि अंबाती रायुडू (19) यांनीही छोटेखानी महत्त्वाच्या खेळी केल्या. गुजरातकडून मोहित शर्माने 3 आणि नूर अहमदने 2 विकेट्स घेतल्या.

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सचे हे पाचवे विजेतेपद ठरले आहे. त्यांनी यापूर्वी 2010, 2011, 2018 आणि 2021 या हंगामात विजेतेपद जिंकले आहे. यासह चेन्नईने मुंबईच्या पाच आयपीएल विजेतेपद जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Explainer: इस्रायल अन् अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला! युद्धाचा भडका का उडाला? जाणून घ्या वादाचं 'मेन' कारण VIDEO

Israel US Attack on Iran: मध्यपूर्वेत युद्धाचा वणवा पेटला! भारतीय नागरिकांसाठी 'ट्रॅव्हल ॲडव्हायजरी' जारी; सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना

"आई-बाबा मला माफ करा, तुमचे स्वप्न मी पूर्ण करु शकले नाही" पोलीस भरतीतील अपयशाच्या धक्क्यातून 26 वर्षीय तरुणीनं संपवलं जीवन

पाकड्यांचा गेम होणार? पल्लेकेलेत पावसाचे काळे ढग; 'वरुणराजा' पाकिस्तानला घरचा रस्ता दाखवणार? जाणून घ्या Weather Report

अडवईतील फुलासारियो डोंगरावर आग, काजू बागायती खाक; 10 उत्पादकांना बसला आर्थिक फटका

SCROLL FOR NEXT