CSK Celebration Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: चॅम्पियन CSK ची हॉटेलमध्ये नाचत एन्ट्री अन् पाथिरानाच्या हातात ट्रॉफी, पाहा Video

आयपीएल 2023 चे विजेतेपद जिंकल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सने हॉटेलमध्ये परतल्यानंतरही जोरदार सेलिब्रेशन केले.

Pranali Kodre

Chennai Super Kings Cerebration after Winning IPL 2023 Title: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेचे विजेतेपद एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने जिंकले. 30 मेच्या मध्यरात्री संपलेल्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सचा 5 विकेट्सने पराभव केला.

या विजयासह चेन्नईने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर विजेतेपद कोरले आहे. त्यामुळे चेन्नईने मुंबई इंडियन्सच्या पाच आयपीएल विजेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. चेन्नईने यापूर्वी 2010, 2011, 2018 आणि 2021 या वर्षीही आयपीएलचे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे.

दरम्यान, हे विजेतेपद जिंकल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने जोरदार सेलिब्रेशन केले. मैदानात सेलिब्रेशन केल्यानंतर हॉटलमध्ये परतल्यानंतरही चेन्नई संघाने आनंद साजरा केला. या सेलिब्रेशनचा व्हिडिओही चेन्नई सुपर किंग्सच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की ट्रॉफी जिंकल्यानंतर जेव्हा चेन्नईचा संघ बसमधून हॉटेलमध्ये परतत होता त्यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना चाहत्यांची गर्दी होती. या वेळी रविंद्र जडेजा, अजिंक्य रहाणे चाहत्यांकडे पाहून हात हलवून त्यांना अभिवादनही करतानाही दिसले.

त्यानंतर हॉटेलमध्ये परतल्यानंतर ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, राजवर्धन हंगारगेकर असे काही खेळाडू नाचतानाही दिसले. त्याचबरोबर एमएस धोनी विजेतेपदानिमित्त केक कापतानाही दिसला. या व्हिडिओला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली असून लाखो लाईक्स आल्या आहेत.

जडेजाने मारले विजयी शॉट

रोमांचक झालेल्या अंतिम सामन्यात अखेरच्या दोन चेंडूंवर विजयासाठी 10 धावांची गरज असताना रविंद्र जडेजाना एक षटकार आणि चौकार मारत चेन्नईला विजय मिळवून दिला.

अंतिम सामन्यात गुजरातने वृद्धिमान साहा (54) आणि साई सुदर्शन (96) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकात 4 बाद 214 धावा केल्या होत्या. पण नंतर चेन्नईच्या फलंदाजीवेळी सुरुवातीलाच पाऊस आल्याने डकवर्थ लुईसनुसार चेन्नईसमोर 15 षटकात 171 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते.

चेन्नईकडून रविंद्र जडेजा 6 चेंडूत 15 धावांवर नाबाद राहिला. तसेच शिवम दुबे 21 चेंडूत 32 धावांवर नाबाद राहिला. याशिवाय चेन्नईकडून डेव्हॉन कॉनवेने सर्वाधिक 47 धावा केल्या. तसेच ऋतुराज गायकवाड (26), अजिंक्य रहाणे (27) आणि अंबाती रायुडू (19) यांनीही छोटेखानी महत्त्वाच्या खेळी केल्या. गुजरातकडून मोहित शर्माने 3 आणि नूर अहमदने 2 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: 'पाकिस्तान झिंदाबाद' फलक प्रकरणी बजरंग दल आक्रमक; तक्रार दाखल

'गोवा गुन्हेगारांसाठी आश्रयस्थान, नागरिकांसाठी मात्र असुरक्षित', LOP युरींचे टीकास्त्र; कायदा व सुव्यवस्था विषयावर अधिवेशन बोलवण्याची मागणी

Goa ZP Election: आरक्षित मतदारसंघांची यादी जाहीर! कवळेकर समर्थकांना धक्‍का, काब्राल समर्थकाला दिलासा; फोंड्यात महिलाराज

Goa Road Diversions: ‘आयर्नमन 70.3’ मुळे गोव्यात वाहतूक मार्गात बदल! पर्यायी रस्ते कोणते? जाणून घ्या..

Kala Academy: 'कला अकादमीच्या दुरुस्तीचे लेखापरीक्षण, चौकशी करा'! कला राखण मांडची मागणी; सचिवांशी विविध विषयांवर चर्चा

SCROLL FOR NEXT