Deepak Chahar - Shivam Dube
Deepak Chahar - Shivam Dube Dainik Gomantak
क्रीडा

Deepak Chahar - Shivam Dube : 'पुढच्या वर्षी तुझ्यात अन् माझ्यात...', दीपक चाहरचं शिवम दुबेला ओपन चॅलेंज

Pranali Kodre

Deepak Chahar Open Challenge to Shivam Dube for One Over Match:

चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल 2023 स्पर्धेचे मे महिन्याच्या अखेरीस विजेतेपद जिंकले. या विजेतेपदामध्ये शिवम दुबे आणि दीपक चाहरने महत्त्वाचा वाटा उचललला होता. पण आता दीपक चाहरने शिवम दुबेला थेट ओपन चॅलेंज दिले आहे.

चाहरने दुबेला चॅलेंज दिले आहे की एका षटकाचा सामना खेळून चेन्नई सुपर किंग्सच्या सार्वकालिन सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनमधील अखेरच्या स्थानाचा निर्णय व्हायला पाहिजे.

दरम्यान झाले असे की चेन्नई सुपर किंग्सने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दुबे त्याच्यामते चेन्नईची सार्वकालिन सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन निवडताना दिसत आहे. त्याने मॅथ्यू हेडन आणि मायकल हसीला सलामीवीर म्हणून निवडले.

त्यानंतर त्याने सुरेश रैना, अंबाती रायुडू, एमएस धोनी, रविंद्र जडेजा यांची नावे घेतली. त्याचबरोबर त्याने अल्बी मॉर्केल, ड्वेन ब्रावो आणि हरभजन सिंग आणि लक्ष्मीपती बालाजी यांचीही निवड केली. त्यानंतर अखेरच्या स्थानासाठी त्याने स्वत:चे नाव घेतले. त्यावर चाहरने त्याला डिवचले आहे.

Chennai Super Kings Instagram

चेन्नईने पोस्ट केलेल्या व्हिडिओवर चाहरने कमेंट केली की 'जर पुढच्यावर्षी शिवम दुबे गोलंदाज म्हणून खेळणार असेल, तर आम्ही कुठे जायचे?'

त्यानंतर त्याने लिहिले की 'सर्वात आधी पुढच्या वर्षी तुझ्यात आणि माझ्यात एक षटकाचा सामना होईल. मी तुला एक षटक गोलंदाजी करेल, तू मला एक षटक गोलंदाजी करायची. त्यानंतर ठरवू कोण जिंकेल आणि ती अखेरची जागा घेईल.'

यावर दुबेने उत्तर दिले की 'तुझ्यासाठी मी आत्ताच जागा सोडली आहे, तू काय तेव्हाची गोष्ट करतोस.' त्यावर लगेचच चाहरने उत्तर दिले 'मला जागा नाही, आता सामना हवा.' त्यानंतर दुबेने हे चॅलेंज स्विकारले.

दरम्यान, आयपीएल 2023 स्पर्धेत शिवम दुबेने शानदार कामगिरी बजावली होती. त्याने 16 सामन्यात 38 च्या सरासरीने 158.33 स्ट्राईक रेटने 418 धावा केल्या आहेत. यात त्याने 3 अर्धशतकेही केली.

याशिवाय चाहरने या हंगामात 10 सामन्यात 13 विकेट्स घेतल्या आहेत. तो या हंगामात दुखापतग्रस्तही झाला होता, ज्यामुळे त्याला काही सामन्यांना मुकावे लागले. पण नंतर त्याने चांगले पुनरागमन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT