Lucknow Super Giants: ऑस्ट्रेलियाला टी20 जगज्जेता करणारा दिग्गज लखनऊचा नवा हेड कोच! गंभीरसह IPL मध्ये करणार मार्गदर्शन

Lucknow Super Giants: लखनऊ सुपर जायंट्सने ऑस्ट्रेलियन दिग्गजाची प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.
Lucknow Super Giants
Lucknow Super GiantsDainik Gomantak

Lucknow Super Giants New head coach : इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL) लखनऊ सुपर जायंट्सने शुक्रवारी (14 जुलै) मोठा निर्णय घेतला. लखनऊने नव्या मुख्य प्रशिक्षकाची नियुक्ती केली आहे.

ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू जस्टीन लँगर यांची लखनऊच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना अँडी फ्लॉवर यांच्या जागेवर निवडण्यात आले आहे.

लखनऊने अँडी फ्लॉवर यांच्याबरोबरचा मुख्य प्रशिक्षकपदाचा प्रवास थांबवला आहे. त्यानंतर लँगर यांची निवड करण्यात आली. फ्लॉवर यांनी 2022 आणि 2023 या आयपीएल हंगामात लखनऊचे प्रशिक्षकपद सांभाळले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही हंगामात संघाने प्लेऑफमध्ये स्थान मिळवले होते.

सध्या फ्लॉवर ऑस्ट्रेलिया संघाचे सल्लागार म्हणून सपोर्ट स्टाफचा भाग आहेत. लखनऊने फ्लॉवर यांचे त्यांच्या योगदानाबद्दल आभार मानले आहेत.

Lucknow Super Giants
Gautam Gambhir: विराट अन् धोनीबरोबर नाते कसे? गंभीरचा मोठा खुलासा; नवीनला पाठिंबा देण्याचं कारणंही सांगितलं

लँगर यांचा प्रशिक्षणाचा अनुभव

दरम्यान, लखनऊने नवे मुख्य प्रशिक्षक झालेल्या लँगर यांना प्रशिक्षकपदाचा तगडा अनुभव आहे. 52 वर्षीय लँगर यांनी 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलियाने 2019 मधील ऍशेसमध्ये बरोबरी साधली, तसेच 2021-22 मधील ऍशेस मालिका जिंकली आहे.

याशिवाय त्यांच्याच प्रशिक्षणाखाली ऑस्ट्रेलियाने संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे झालेला टी20 वर्ल्डकप 2021 स्पर्धा जिंकली होती.

याशिवाय त्यांनी पर्थ स्कॉचर्सचेही मुख्य प्रशिक्षकपद सांभाळताना 2013-14, 2014-15 आणि 2016-17 अशा बिग बॅश लीगच्या तीन हंगामाचे विजेतेपद जिंकून दिले होते. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की लँगर हे प्रशिक्षक म्हणून पहिल्यांदाच आयपीएलचा भाग बनले आहे.

Lucknow Super Giants
Virender Sehwag Son: सेहवाग म्हणतोय, 'माझ्या दोन्ही मुलांना बनायचंय ऑलराऊंड, कारण IPL मध्ये...'

गंभीरशी चांगले संबंध

लँगर यांचे लखनऊ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक गौतम गंभीरशी चांगले संबंध आहेत. साल 2015 मध्ये गंभीरने त्यांच्याकडून ट्रेनिंगही घेतले होते. तसेच त्याने त्यांना 2015 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळण्यासाठी ऑफर दिली होती. पण त्यावेळी आपल्या आजारी आईच्या काळजीपोटी त्यांनी ही ऑफर नाकारली होती.

ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू

लँगर हे ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 105 कसोटी सामने खेळले असून 23 शतके आणि 30 अर्धशतकांसह 45.27 च्या सरासरीने 7696 धावा केल्या आहेत. तसेच त्यांनी 8 वनडे सामने खेळले असून 160 धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com