Goa football Dainik Gomantak
क्रीडा

गोमंतकीय व्हिन्सी बार्रेटो चेन्नईयीन संघात

दैनिक गोमन्तक

पणजी: गोमंतकीय फुटबॉलपटू व्हिन्सी बार्रेटो याच्याशी चेन्नईयीन एफसीने करार केला आहे. गतमोसमात तो आयएसएल उपविजेत्या केरळा ब्लास्टर्स संघातर्फे खेळला. विंगर असलेला व्हिन्सी 2021-2022 मोसमात केरळा ब्लास्टर्सतर्फे 17 सामने खेळला होता. यात त्याने दोन गोल नोंदविले. साखळी फेरीत त्याने हैदराबाद एफसीविरुद्ध डाव्या पायाने केलेला सणसणीत फटक्यावरील गोल प्रेक्षणीय ठरला होता. ( Chennai FC have signed Vince Barreto, a footballer from Gomantak )

युवा खेळाडूंच्या डेव्हलपमेंट लीग फुटबॉल स्पर्धेतही 22 वर्षीय व्हिन्सीने केरळा ब्लास्टर्सतर्फे उल्लेखनीय खेळ करताना सात सामन्यांत तीन गोल नोंदविले होते. 2021-2022 मोसमासाठी चेन्नईयीन एफसीने करारबद्ध केलेला व्हिन्सी हा पहिला नवा खेळाडू आहे.

युवा दमाच्या व्हिन्सी बार्रेटोला आमच्या संघाच्या आक्रमणात सामील करून घेताना आनंद होत असल्याची प्रतिक्रिया चेन्नईयीन एफसीच्या सहमालक विता दाणी यांनी दिली. व्हिन्सी यापूर्वीच आपली क्षमता सिद्ध केली असून त्याचा करारबद्ध सकारात्मक असल्याचेही त्यांनी नमूद केले. हल्लीच चेन्नईयीन एफसीने अनुभवी युवा खेळाडू अनिरुद्ध थापा याचा करार आणखी दोन वर्षांसाठी वाढविला आहे.

धेंपो क्लबचा माजी खेळाडू

व्हिन्सी बार्रेटो हा धेंपो स्पोर्टस क्लबचा माजी खेळाडू आहे. या संघातर्फे खेळत असतानाच त्यांचे कौशल्य बहरले.‘‘चेन्नईयीन एफसी संघात रुजू होताना मी खूप उत्साहित आहे. या क्लबचा इतिहास गौरवशाली आहे. या क्लबतर्फे खेळताना अधिकाधिक करंडक जिंकणे हेच माझे ध्येय राहील,’’ असे मत व्हिन्सी याने व्यक्त केले.

धेंपो क्लबच्या युवा संघातून खेळताना छाप पाडल्यानंतर व्हिन्सी वयाच्या 18 व्या वर्षी एफसी गोवा संघाच्या डेव्हलपमेंट संघात दाखल झाला. तो संघात असताना एफसी गोवाने 2018-19 मोसमात गोवा प्रोफेशनल लीग स्पर्धा जिंकली.त्यानंतर त्याने आय-लीग स्पर्धेतील गोकुळम केरळा संघाशी करार केला. या संघाने 2020-21 मोसमात आय-लीग स्पर्धा जिंकली तेव्हा व्हिन्सी गोकुळम केरळाच्या आक्रमणातील प्रमुख खेळाडू ठरला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT