Chelsea Manager Graham Potter Dainik Gomantak
क्रीडा

Graham Potter: धक्कादायक! चेल्सीच्या मॅनेजरला येतायेत जीवे मारण्याच्या धमक्या...

Chelsea चे मॅनेजर ग्रॅहम पॉटर यांनी खुलासा केला आहे की त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.

Pranali Kodre

Chelsea Manager Graham Potter Receiving Death Threats: चेल्सी फुटबॉल क्लबेच मॅनेजर ग्रॅहम पॉटर यांनी नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले आहे की संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.

सध्या चेल्सी संघ खराब फॉर्मचा सामना करत आहे. त्यांना गेल्या 14 सामन्यांमधील केवळ दोन सामने जिंकता आले आहेत. आता त्यांना रविवारी टॉटेनहॅमविरुद्ध सामना खेळायचा आहे.

पॉटर यांनी सांगितले आहे की 'मला पाठिंबा मिळत आहे. पण मला काही असेही इमेल्स आले आहेत, जे चांगले नाहीत. त्यांना असे वाटते की मी आणि माझ्या मुलांचा मृत्यू व्हावा.'

पॉटर यांनी म्हटले आहे की 'परिस्थितीत जशी आहे तशी तुम्ही ती स्विकारली पाहिजे. टीका स्विकारली पाहिजे. पण चुकीच्या गोष्टींमध्ये अडकू नका. एखादा दृष्टीकोन जरुर असावा पण त्याचवेळी टीका आणि वाईट भावना समजून घ्या. हे असेच असायला हवे.'

त्यांनी पुढे म्हटले, 'हे आव्हान आहे आणि जर तुम्ही कामला जात असाल आणि कोणीतरी तुम्हाला त्रास देण्याची शपथ घेतली असेल, तर ते नक्कीच आनंददायी नसेल. जेव्हा तुम्हाला क्लबच्या इतिहासातील सर्वात वाईट व्यक्ती समजले जात असेल, तर तुम्ही प्रश्नाचे दोन प्रकारे उत्तर देऊ शकता.'

'तुम्ही एककर म्हणू शकता की मला फरक पडत नाही. पण तुम्हालाही माहित असते तुम्ही खोटे बोलत आहात. कारण प्रत्येकजण लोक काय विचार करतात, याबद्दल विचार करतो. आपण सर्वजणच सामाजिकरित्या जोडलेले आहोत.'

'त्यात एक गोष्ट आहे की मला यशस्वी व्हायचे आहे. त्यामुळे मला फरक पडत नाही, ही कल्पनाच मूर्खपणाची आहे. माझ्या कुटुंबाला विचारा. कारण लोकांना वाटते की मला फरक पडत नाही. पण माझ्या कुटुंबाला विचारा माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी आयुष्य प्रत्येकवेळी आनंददायी नसते.'

'मला समजते की चाहते जेव्हा घरी जातात तेव्हा त्यांचा संघ न जिंकल्याने ते नाराज झालेले असतात. पण मी तुम्हाला याची खात्री देतो की गेल्या तीन-चार महिन्यांपासून माझे आयुष्यही साधारण राहिले आहे. पण याव्यतिरिक्त मला मिळालेल्या अनुभवासाठी मी कृतज्ञ आहे. मी जशाप्रकारे टीकेकडे पाहातो, तसेच मी याकडेही पाहातो. तुम्ही अनुभवाबद्दल असेही म्हणू शकता की चांगले आव्हान आहे,' असेही ते म्हणाले.

तसेच त्यांना येणाऱ्या धमक्यांबद्दल ते म्हणाले, 'यामुळे मी हललो नाही. हे फक्त मर्यादा पार करणारे आहे. मला वाटते की मी यापेक्षा जास्त त्याला महत्त्व देत नाही. कुटुंबासाठी हे आनंददायी नाही. तुम्ही टीका स्विकारता, तुम्ही पराभवानंतर होणारी नारेबाजी स्विकारता. तुम्ही तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व गोष्टी स्विकारता. पण नक्कीच त्याला काही मर्यादा असतात. पण मी जगातील पहिलाच व्यक्ती नाही, ज्याच्याबाबतीत या मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत.'

आता चेल्सीला रविवारी टॉटेनहॅमविरुद्ध सामना खेळायचा आहे. सध्या चेल्सी प्रीमीयर लीगमध्ये 10 व्या क्रमांकावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT