Indian Super League: बंगळूरकडून झालेल्या पराभवाची एफसी गोवा प्रशिक्षकांनी स्विकारली जबाबदारी, म्हणाले...

बंगळूर येथील श्री कांतीरावा स्टेडियमवर एफसी गोवाला 1-3 फरकाने हार स्वीकारावी लागली
Indian Super League
Indian Super LeagueDainik Gomantak
Published on
Updated on

किशोर पेटकर

Indian Super League इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत यंदा प्ले-ऑफ फेरी गाठणे हे एफसी गोवाचे उद्दिष्ट होते, पण त्यात अपयश आले, अशी कबुली संघाचे मुख्य प्रशिक्षक कार्लोस पेनया यांनी बंगळूर एफसीविरुद्धच्या पराभवानंतर दिली.

आयएसएल प्ले-ऑफ फेरीसाठी एफसी गोवा संघाला बंगळूरविरुद्ध गुरुवारी रात्री विजय आवश्यक होता, पण बंगळूर येथील श्री कांतीरावा स्टेडियमवर त्यांना 1-3 फरकाने हार स्वीकारावी लागली. त्यामुळे 27 गुणांसह त्यांना ‘टॉप सिक्स’मधून बाहेर राहावे लागले व प्ले-ऑफ फेरी हुकली.

सामन्यानंतर पेनया म्हणाले, ‘‘आमच्यासाठी यावेळचा मोसम सोपा नव्हता. नववा क्रमांक मिळालेल्या मोसमानंतर आम्ही पुनरागमन करत आहोत याचा मी बऱ्याच वेळा पुनरुच्चार केला. त्यामुळे सातवा क्रमांक मिळाल्याने आनंदित होता येणार नाही, कारण प्ले-ऑफचे उद्दिष्ट आम्ही गाठू शकलो नाही.

आम्ही निराश आहोत. आमची व्यूहरचना, आम्ही केलेल्या चुका यांचे विश्लेषण करू. आता आम्ही पुढील स्पर्धेसाठी सज्ज होणार आहोत.’’ येत्या एप्रिलमध्ये केरळमध्ये होणाऱ्या सुपर कप स्पर्धेत एफसी गोवा संघ खेळणार आहे. 2018-19 मध्ये त्यांनी ही स्पर्धा जिंकली होती.

Indian Super League
Goa Traffic: पणजी, पर्वरीत वाहतूक कोंडीची समस्या कायम, रुग्णवाहिकांनाही बसतोय फटका

नोआ सदावीची नजर सुपर कपवर

एफसी गोवाचा प्रमुख खेळाडू नोआ सदावी याच्यासाठी यावेळची आयएसएल स्पर्धा वैयक्तिकदृष्ट्या सफल ठरली. मोरोक्कोच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूने नऊ गोल व नऊ असिस्टची नोंद केली. आयएसएल स्पर्धेची प्ले-ऑफ गाठण्यास अपयश आल्यामुळे तो सुद्धा निराश आहे, पण भविष्याचा विचार करत त्याने सकारात्मक मनोगत सोशल मीडियावर व्यक्त केले.

‘‘भविष्य उज्ज्वल आहे आणि आम्हाला संघ या नात्याने विश्वास ठेवावा लागेल. निव्वळ योगायोगाने काहीही साध्य होत नाही, आम्हाला खडतर मेहनत घ्यावी लागेल,’’ असे नोआ याने नमूद केले. एफसी गोवा चाहत्यांनी प्रदर्शित केलेल्या बिनशर्त प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

‘‘अजून काम पूर्ण झालेले नाही. वाटचाल खडतर असल्याचे मला माहीत आहे. आमची वेळ येईल. एकत्रितपणे सुपर कपसाठी जायचे आहे. देव बरें करूं,’’ असे 29 वर्षीय खेळाडू संदेशात म्हणाला.

Indian Super League
Goa Cricket Association: जीसीए प्रीमियर लीगला एक मार्चपासून होणार सुरवात, गतविजेत्या जीनो क्लबची ईशानवर मदार

सातव्या क्रमांकावर शिक्कामोर्तब

आयएसएल स्पर्धेत शुक्रवारी रात्री चेन्नई येथे झालेल्या लढतीत नॉर्थईस्ट युनायटेडवर 4-3 अशी निसटती मात केल्यामुळे चेन्नईयीन एफसीचेही एफसी गोवा संघाइतकेच 27 गुण झाले. मात्र एफसी गोवाचा गोलफरक (36-35) +1 असा सरस ठरला. त्यांना सातवा क्रमांक मिळाला. चेन्नईयीन संघ 36-37 या -1 गोलफरकारसह आठव्या स्थानी राहिला. एकमेकांविरुद्ध (हेड टू हेड) मोसमात एफसी गोवाची चेन्नईयीनविरुद्ध 3-2 (2-0, 1-2) अशी सरशी झाली. फक्त पाच गुणांसह नॉर्थईस्ट युनायटेड संघ शेवटच्या अकराव्या स्थानी राहिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com