Manchester City and Real Madrid Dainik Gomantak
क्रीडा

Champions League SF 2023: रोमांचक सेमीफायनलमध्ये सिटीने मद्रिदविरुद्ध साधली बरोबरी, डी ब्रुयन गोल ठरला महत्त्वाचा

चॅम्पियन्स लीग सेमीफायनलमध्ये मंगळवारी मँचेस्टर सिटीने रिअल मद्रिदविरुद्ध बरोबरी साधण्यात यश मिळवले.

Pranali Kodre

Champions League semifinal between Manchester City and Real Madrid: मंगळवारी चॅम्पियन लीगच्या उपांत्य फेरीत मँचेस्टर सिटी आणि रिअल मद्रिद यांच्यात मंगळवारी पहिल्या लेगचा सामना झाला. हा सामना 1-1 अशा बरोबरीसह संपला. त्यामुळे आता दुसऱ्या लेगमध्ये या दोन्ही संघात चूरस पाहायला मिळेल.

केविन डी ब्रुयनने केलेल्या शानदार गोलमुळे मँचेस्टर सिटीला या सामन्यात बरोबरी साधता आली. त्याआधी मद्रिदसाठी विविसियस ज्युनियरने पहिला गोल केला होता.

या सामन्यात सुरुवातीला मँचेस्टर सिटीने वर्चस्व ठेवले होते. पण पहिल्याच हाफमध्ये ३६ व्या मिनिटाला विनिसियसने मद्रिदसाठी गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली.

खरंतर सँटियागो बर्नाबेऊ स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मँचेस्टर सिटीने चेंडूवर सर्वाधिक ताबा ठेवला होता. पण मद्रिदने आघाडी मिळवण्याच यश मिळवले. एर्लिंग हॉलंडला सुरुवातीला काही संधीही मिळाल्या होत्या. पण त्याला गोल करण्यात अपयश आले.

हॉलंड सिटीसाठी चॅम्पियन लीगच्या या हंगामातील महत्त्वाचा खेळाडू ठरला आहे. त्याने सिटीच्या 26 पैकी 12 गोल केले आहेत. तो चॅम्पियन लीगच्या एका हंगामात सर्वाधिक 17 गोल करण्याचा ख्रिस्तियानो रोनाल्डोचा विक्रम मोडू शकतो. रोनाल्डोने मद्रिदसाठी 2013-14 साठी हा विक्रम केला होता.

अखेर कॅमाविंगाने दिलेल्या पासवर मद्रिदने चेंडूवरील ताबा गमावला त्यानंतर डी ब्रुयनने 67 व्या मिनिटाला शानदार गोल करत सिटीला बरोबरी साधून दिली. यानंतर दोन्ही संघांकडून गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे हा सामना 1-1 अशा बरोबरीत सुटला.

याबद्दल मद्रिदचा मिडफिल्डर लुका मॉड्रिक म्हणाला, 'आम्ही तो गोल स्विकारायला नको होता. आम्ही नक्कीच यापेक्षा अधिक गोष्टीसाठी पात्र होतो. त्यांच्याकडे चेंडूचा अधिक ताबा होता, पण त्यांना अधिक संधी निर्माण करता आल्या नाही. हा सामना 50-50 झाला. आम्ही आता दुसऱ्या सामन्यात आत्मविश्वासासह उतरू.'

मद्रिदचे प्रशिक्षक कार्लो अँसेलोटी म्हणाले, 'मला वाटचे दोन्गी संघांना हेच वाटत असेल, की हा चांगला निकाल आहे. कदाचीत आम्ही थोडे चांगले खेळलो, त्यामुळे आम्ही विजयासाठी पात्र होतो, पण ही अशी मालिका आहे, जी शेवटपर्यंत बरोबरीत राहिली.'

सिटीचे प्रशिक्षक पेप गार्डिओला म्हणाले, 'हा बरोबरीचा सामना होता. आम्ही चांगले खेळत असताना त्यांनी गोल केला आणि जेव्हा ते चांगले खेळत होते, तेव्हा आम्ही गोल केला. आता मँचेस्टरमध्ये निर्णायक सामना होईल.'

मद्रिद 13 हंगामात 11 व्यांदा उपांत्य फेरीत खेळत आहेत. तसेच ते गेल्या 10 वर्षातील सहावे विजेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहेत. सिटीने पहिल्यांदा दोन हंगामांपूर्वी अंतिम सामना खेळला होता, ज्यात त्यांनी चेल्सीविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागलेला.

याशिवाय बुधवारी इंटर मिलान आणि एसी मिलान यांच्यात उपांत्य फेरीतील पहिल्या लेगचा सामना पार पडणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Who After Ravi Naik: फोंड्यातील पोटनिवडणुकीवरून भाजपसमोर पेच! रवी नाईक यांचे कनिष्‍ठ सुपुत्र 'रॉय' यांच्या नावाचाही आग्रह

Ranji Trophy 2025: हुर्रे! गोव्याची दणदणीत विजयी ‘दिवाळी’, चंडीगडला नमवले; पाहुणा 'ललित' सामन्याचा मानकरी

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

SCROLL FOR NEXT