Chamika Karunaratne  Dainik Gomantak
क्रीडा

Sri Lanka Cricket: श्रीलंकन अष्टपैलूला 'ही' चूक पडली महागात, एक वर्षासाठी झाला निलंबित

श्रीलंकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू चमिका करुणारत्नेवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

श्रीलंकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू चमिका करुणारत्नेवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. श्रीलंका क्रिकेट मंडळाने त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. त्यामुळे त्याला शिक्षा म्हणून क्रिकेटमधून एक वर्षाची बंदी आणि दंडही आकारण्यात आला आहे.

श्रीलंकन बोर्डाच्या (Sri Lanka Cricket) तीन सदस्यीय समितीने केलेल्या शिस्तभंगाच्या चौकशीनंतर कार्यकारी समितीने ही शिक्षा सुनावली आहे. तीन सदस्यीय समितीला त्याने अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले आहे. दरम्यान, करुणारत्नेने (Chamika Karunaratne) त्याच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप मान्य केले आहेत.

त्यामुळे त्याच्यावर क्रिकेटच्या सर्व प्रकारात खेळण्यासाठी एक वर्षाची बंदी आणि 5000 यूएस डॉलर दंड आकारण्यात आला आहे.

श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे की "करुणारत्नेनी केलेल्या उल्लंघनाचे गांभीर्य लक्षात घेऊन, चौकशी समितीने आपल्या अहवालाद्वारे कार्यकारी समितीला शिफारस केली आहे की खेळाडूंना पुढील उल्लंघनांपासून परावृत्त करावे आणि अशी शिक्षा द्यावी ज्याचा परिणाम त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवर जास्त होणार नाही."

"चौकशी पॅनेलच्या या निष्कर्ष आणि शिफारशींनंतर कार्यकारी समितीने त्याच्या सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये भाग घेण्यावर एक वर्षाची बंदी घातली आहे."

करुणारत्ने नुकताच टी20 विश्वचषकात श्रीलंकेकडून खेळताना दिसला होता. त्याने 7 सामन्यात खेळताना 3 विकेट्स घेतल्या होत्या. पण त्याला फलंदाजीसाठी फारशी संधी मिळाली नाही. त्याआधी त्याने श्रीलंकेला यावर्षीचा आशिया चषक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT