IMF Loan: भारताचे शेजारी कर्जबाजारी ; पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश अव्वल

IMF
IMFDainik Gomantak
Published on
Updated on

परकीय चलनाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे श्रीलंका देशावर ओढवलेली परिस्थिती आपण पाहिली आहे. पाकिस्तानची देखील परिस्थिती वेगळी नाहीय. अशात बांगलादेश प्रगती करत असल्याचे चर्चा होती. मात्र, भारताचे शेजारी असणारे हे तिन्ही देश आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) कर्जाखाली दबले असल्याचे दिसून येत आहे. आयएमएफकडून सर्वाधिक कर्ज घेण्यात पाकिस्तान (Pakistan) अव्वल असून, श्रीलंका (Srilanka) दुसऱ्या आणि बांगलादेश (Bangladesh) तिसऱ्या क्रमांकावर आहे.

कर्ज घेण्याच्या बाबतीत अफगाणिस्तान (Afghanistan) चौथ्या क्रमांकावर आहे. तर या म्यानमार (Myanmar) पाचव्या आणि नेपाळ (Nepal) सहाव्या क्रमांकावर आहे.

कोणत्या देशावर किती कर्ज ?

पाकिस्तान - पाकिस्तान देशाने आयएमएफ कडून आतापर्यंत 5194 दशलक्ष डॉलर्सचं कर्ज घेतलं आहे.

श्रीलंका - श्रीलंकेनं जागतिक बँकेकडून 600 दशलक्ष डॉलर्सचं कर्ज घेतलं आहे.

बांगलादेश - बांगलादेशने 762 दशलक्ष डॉलर्स कर्ज घेतलं आहे.

अफगाणिस्तान - अफगाणिस्ताननं आतापर्यंत 378 दशलक्ष डॉलर्सचं कर्ज घेतलं आहे.

IMF
गोवा फॉरवर्डच्या पदाधिकाऱ्यांवरील कारवाई न्यायालयाकडून रद्द

कोरोना काळात आर्थिक संकट गडद

जगासमोर 2021 च्या तोंडावर कोरोना या जीवघेण्या संसर्गाचे संकट उभे राहिले. यामुळे अनेक देशांनी आर्थिक स्थिती कोलमडून पडली. वैद्यकिय सुविधा, औषधे आणि लस यावर अधिक पैसा खर्च झाला. श्रीलंका देश जो पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे, कोरोनामुळे पर्यटन बंद झाल्याने त्या देशावर मोठं संकट आले. अलिकडे या देशाने त्याची किंमत मोजली. बांगलादेश देखील आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी आयएमएफकडे अर्ज करत आहे. म्यानमार (Myanmar) आणि नेपाळ (Nepal) देखील आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आयएमएफकडे निधीची मदत मागत आहे.

IMF
भारताचे ‘चुलत शेजारी’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com