सराव सत्रात खेळाडूंना सूचना करताना एफसी गोवाचे प्रशिक्षक हुआन फेरांडो Dainik Gomantak
क्रीडा

एफसी गोवासमोर योग्य मानसिकता राखण्याचे आव्हान

सलग तीन सामने गमावलेल्या संघाची वास्कोत ईस्ट बंगालविरुद्ध कसोटी

दैनिक गोमन्तक

पणजी: एफसी गोवा संघावर पाच वर्षांनंतर इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल (Football) स्पर्धेत सुरवातीचे तिन्ही सामने गमावण्याची नामुष्की आली. आता चौथ्या सामन्याच्या पूर्वसंध्येला प्रशिक्षक हुआन फेरांडो यांनी संघाच्या मानसिकतेचे महत्त्व प्रतिपादले, तसेच कठीण काळात चाहत्यांनी संघावर विश्वास ठेवावा असेही आवाहन केले आहे.

एफसी गोवा आणि ईस्ट बंगाल यांच्यातील सामना मंगळवारी वास्को येथील टिळक मैदानावर खेळला जाईल. दोन्ही संघ सध्या स्पर्धेत विजयाविना आहेत. सलग पराभवामुळे गुणतक्त्यात एफसी गोवाचे खाते रिक्त आहे. मानोला डायझ यांच्या मार्गदर्शनाखालील ईस्ट बंगालने चारपैकी दोन सामन्यांत हार पत्करली असली, तरी दोन बरोबरीमुळे कोलकात्याच्या संघाला दोन गुणांचा दिलासा मिळालेला आहे.

फेरांडो सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत म्हणाले, की ‘‘पुढील सामन्यासाठी सज्ज होण्याची मानसिकता आवश्यक आहे. संघाला अधिक आत्मविश्वासाने खेळावे लागेल. तणावविरहीत खेळ करताना भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल.’’FC Goa मागील लढतीत नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध भरपाई वेळेत गोल स्वीकारल्यामुळे पराभवाचा सामना करावा लागला. स्पर्धेच्या सुरवातीस सलग तीन पराभवामुळे नामुष्की त्यांच्यावर 2016 मध्ये आली होती.

ईस्ट बंगालविरुद्ध एफसी गोवासाठी खेळावर पूर्ण वर्चस्व राखावे लागेल, असेही 40 वर्षीय स्पॅनिश प्रशिक्षकाने नमूद केले. ‘‘उद्याचा सामनाही कठीण आहे. सामन्यावर नियंत्रण राखताना आम्हाला संयमही बाळगावा लागेल. प्रतिस्पर्धी निश्चितच संधीच्या शोधात असतील आणि आमच्या चुका हेरण्यावर त्यांचा भर राहील, असे फेरांडो यांनी आपल्या संघाला सावध करताना सांगितले. मंगळवारच्या सामन्यासाठी मैदानावर समतोल संघ दिसेल, असेही त्यांनी नमूद केले.

मागील दोन्ही लढती बरोबरीत

  • एफसी गोवा आणि ईस्ट बंगाल यांच्यात आयएसएलमधील 2 लढती बरोबरीत

  • 6 जानेवारी 2021 रोजी वास्को येथे 1-1, तर 29 जानेवारी 2021 रोजी फातोर्डा येथे 1-1 गोलबरोबरी

  • सामन्यापूर्वी...

  • एफसी गोवाचा मुंबई सिटी (0-3), जमशेदपूर एफसी (1-3), नॉर्थईस्ट युनायटेड (1-2) या संघांविरुद्ध पराभव

  • ईस्ट बंगालची जमशेदपूर (1-1) व चेन्नईयीनविरुद्ध (0-0) बरोबरी, तर एटीके मोहन बागान (0-3) व ओडिशा एफसी (4-6) या संघांकडून हार

  • दोन्ही संघांचा बचाव प्रश्नांकित. प्रतिस्पर्ध्यांचे एफसी गोवावर 8, तर ईस्ट बंगालवर 10 गोल

  • यंदा स्पर्धेत एफसी गोवातर्फे फक्त 2 , तर ईस्ट बंगालतर्फे 5 गोल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Trafficking: गोवा पोलिसांची धडक कारवाई! स्विगी डिलिव्हरी एजंटला ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटक; 'इतक्या' हजारांचा गांजा जप्त

AUS vs SA: इतिहास घडला...! ऑस्ट्रेलियाच्या 22 वर्षीय पठ्ठ्यानं दक्षिण आफ्रिकेची तगडी फलंदाजी केली ध्वस्त; मोडला 38 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral Video: 'मत रो मेरे दिल...'! दारुच्या नशेत पकडल्यावर पठ्ठ्याला बायकोची आठवण, गाण्याला पोलिसानंही दिली साथ; व्हिडिओ एकदा बघाच

AUS vs SA: दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव! ऑस्ट्रेलियाने मोडला भारताचा कीर्तिमान; हेड, मार्श अन् कॅमेरुनची वादळी शतके

Congress MLA Arrested: 12 कोटी कॅश, 6 कोटींचं सोनं... मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेस आमदाराला अटक, ईडीची कारवाई

SCROLL FOR NEXT