Carlos Alcaraz Dainik Gomantak
क्रीडा

Wimbledon 2023: अल्कारेज नवा विम्बल्डन विजेता! दिग्गज जोकोविचला थरारक फायनलमध्ये पराभवाचा धक्का

Carlos Alcaraz: 20 वर्षीय अल्कारेजने नोवाक जोकोविचला पराभूत करत विम्बल्डन 2023 विजेतेपद आपल्या नावे केले.

Pranali Kodre

Carlos Alcaraz won Wimbledon 2023 after beating Novak Djokovic in the Final: विम्बल्डन 2023 स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद २० वर्षीय स्पेनच्या कार्लोस अल्कारेजने आपल्या नावे केले. रविवारी झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यात अव्वल मानांकित अल्कारेजने दुसऱ्या मानांकित आणि 23 ग्रँडस्लॅम विजेत्या नोवाक जोकोविचला पराभवाचा धक्का दिला.

अल्कारेजने जोकोविचला 4 तास 42 मिनिटे चाललेल्या अंतिम सामन्यात 1-6, 7-6(6), 6-1, 3-6, 6-4 अशा पाच सेटमध्ये पराभूत केले. हे अल्कारेजचे दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. त्याने २०२२ मध्ये अमेरिकन ओपनचे विजेतेपद जिंकले होते. त्यामुळे वयाची 20 वर्षे पूर्ण करण्यापूर्वी दोन ग्रँडस्लॅम जिंकणारा तो ओपन एरामधील केवळ पाचवाच खेळाडू आहे.

जोकोविच सेंटर कोर्टमध्ये आठवे विम्बल्डन जिंकण्याच्या इराद्याने उतरला होता. पण त्याला त्याच्याच बालेकिल्ल्यात युवा अल्कारेजने कडवी झुंज देत पराभवाचा धक्का दिला. जोकोविच तबब्ल 34 सामन्यांनंतर विम्बल्डनमध्ये पराभूत झाला. त्याने गेल्या 4 विम्बल्डनमध्ये सलग विजेतेपद मिळवले होते.

या सामन्यातही जोकोविचने दणक्यात सुरुवात केली होती. पहिल्या सेटमध्ये त्याने अल्कारेजला कोणतीच संधी न देता 6-1 असा सामना आपल्या नावे केला होता. पण त्यानंतर अल्कारेजने दमदार पुनरागमन केले. त्याने दुसऱ्या सेटमध्ये चिवट खेळ करत टायब्रेकमध्ये विजय मिळवला.

त्यानंतर तिसरा सेट त्याने 6-1 असा सहज जिंकला. पण जोकोविचनेही चौथ्या सेटमध्ये आपल्या अनुभवाच्या जोरावर पुनरागमन करण्यात यश मिळवले. त्याने चौथा सेट जिंकत सामना निर्णायक पाचव्या सेटमध्ये जाईल, याची काळजी घेतली. मात्र, अखेरच्या सेटमध्ये जोकोविचला पुन्हा अल्कारेज भारी पडला आणि त्याने विजेतेपदही जिंकले.

सामना संपल्यानंतर अल्कारेज भावूक झाला होता. तो म्हणाला, 'हा माझ्यासाठी स्वप्नपूर्तीचा क्षण आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे नक्कीच हा चांगला विजय आहे. पण जरी मी पराभूत झालो असतो, तरी मला इथपर्यंतच्या प्रवासाबद्दल माझा अभिमान वाटला असता. या सुंदर स्पर्धेत इतिहास घडवणे, आपल्या या खेळाच्या दिग्गजाविरुद्ध अंतिम सामना खेळणे हा शानदार क्षण आहे.'

लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की या विजयानंतर अल्कारेज जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर कायम राहाणार आहे.

जोकोविचचा स्वप्नभंग

दरम्यान, जोकोविचला 24 वे ऐतिहासिक ग्रँडस्लॅमची रविवारी अपेक्षा होती. जर त्याने रविवारी अंतिम सामन्यात विजय मिळवला असता, तर त्याने मार्गारेट कोर्टच्या 24 ग्रँडस्लॅम विजेतेपदांच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली असती.

तसेच त्याला रॉजर फेडररच्या आठ विम्बल्डन विजेतेपदांच्या विक्रमाशीही बरोबरी करण्याची संधी होती. पण अल्कारेजने त्याला पराभवाचा धक्का दिल्याने त्याचे स्वप्न भंगले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ST Reservation Bill Passed: गोव्यातील एसटी समाजासाठी आनंदाची बातमी; राजकीय आरक्षण देणारे विधेयक लोकसभेत मंजूर

ST Reservation Goa: 'काँग्रेसमुळे रखडले एसटी समाजाचे राजकीय आरक्षण'; सत्ताधारी - विरोधकांची सभागृहात खडाजंगी

Goa Assembly Live: माजी राज्यपाल स्व. सत्यपाल मलिक यांना विधानसभेत श्रद्धांजली

Raksha Bandhan 2025: लहान भावाला द्या अशा भेटवस्तू, जे पाहून त्याच्या चेहऱ्यावर येईल हसू; पाहा Gift Ideas

Satyapal Malik Death: गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन, ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT