carlos alcaraz and djokovic Dainik Gomantak
क्रीडा

Australian Open 2026: नव्या युगाची नांदी, 'अल्काराज' ठरला टेनिसचा नवा किंग! नोवाक जोकोविचचा पराभव करुन पटकावलं पहिलं ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद VIDEO

Carlos Alcaraz Wins Australian Open: स्पेनच्या युवा सुपरस्टार कार्लोस अल्काराजने ऑस्ट्रेलियन ओपन 2026 चे विजेतेपद पटकावून इतिहास रचला.

Manish Jadhav

Carlos Alcaraz Wins Australian Open: टेनिसच्या जगात एका नव्या युगाची सुरुवात झाली असून स्पेनच्या युवा सुपरस्टार कार्लोस अल्काराजने ऑस्ट्रेलियन ओपन 2026 चे विजेतेपद पटकावून इतिहास रचला. रविवारी (1 फेब्रुवारी) झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात अल्काराजने टेनिस विश्वातील दिग्गज नोवाक जोकोविचचा पराभव करत आपल्या कारकिर्दीतील पहिले ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद जिंकले. जोकोविच आपले 25 वे ग्रँड स्लॅम जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरला होता, परंतु अल्काराजच्या आक्रमक खेळासमोर त्याचा निभाव लागला नाही.

अल्काराजने हा सामना 2-6, 6-2, 6-3, 6-4 अशा सेटमध्ये जिंकून टेनिस प्रेमींची मने जिंकली. या विजयासह अल्काराजने 88 वर्षांपूर्वीचा डॉन बज यांचा विक्रम मोडीत काढला असून, टेनिसच्या इतिहासात तो सर्वात तरुण वयात 'करिअर ग्रँड स्लॅम' पूर्ण करणारा पुरुष खेळाडू ठरला.

कार्लोस अल्काराजने वयाच्या अवघ्या 22 वर्षे आणि 272 दिवसांत हे अभूतपूर्व यश संपादन केले. यापूर्वी डॉन बजने 22 वर्षे आणि 363 दिवसांत करिअर स्लॅम पूर्ण करण्याचा विक्रम केला होता. अल्काराजने याआधी विम्बल्डन (2023, 2024), फ्रेंच ओपन (2024, 2025) आणि यूएस ओपन (2022) ही जेतेपदे आधीच जिंकली होती. आता ऑस्ट्रेलियन ओपनवर नाव कोरल्यामुळे त्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. हा पराक्रम करणारा तो जगातील आठवा पुरुष खेळाडू ठरला असून त्याने डॉन बज, रॉड लेव्हर, रॉजर फेडरर आणि राफेल नडाल यांसारख्या दिग्गजांच्या पंक्तीत मानाचे स्थान मिळवले आहे.

या विजयामुळे टेनिस विश्वात अल्काराजची पकड अधिक घट्ट झाली आहे. अनुभवी जोकोविचला पराभूत करणे ही सोपी गोष्ट नव्हती, मात्र पहिल्या सेटमध्ये पिछाडीवर पडल्यानंतरही अल्काराजने ज्या जिद्दीने पुनरागमन केले, ते त्याच्या जागतिक दर्जाच्या कौशल्याचे दर्शन घडवते. विशेष म्हणजे, इतक्या कमी वयात सात ग्रँड स्लॅम जिंकणे ही बाब त्याला भविष्यातील सर्वात महान खेळाडूंच्या यादीत आघाडीवर नेते. अल्काराजने केवळ जेतेपद जिंकले नाही, तर टेनिसमधील एक पिढी बदलल्याचे संकेत दिले आहेत. 88 वर्षांचा जुना विक्रम मोडणारा हा स्पॅनिश खेळाडू आता टेनिसच्या नवीन पर्वाचा चेहरा बनला असून त्याचे हे यश आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात! बस-ट्रकची समोरासमोर जोरदार धडक; 11 जणांचा मृत्यू, 33 प्रवासी गंभीर जखमी VIDEO

Goa Electoral Roll: मतदार यादीतून 6 जणांची नावे वगळणे बेकायदेशीर; उच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला दणका

Horoscope: धनत्रयोदशीला लक्ष्मी-कुबेराची विशेष कृपा! 'या' राशींचे नशीब चमकणार; धनलाभासह नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत

Chimbel Krishna Temple: देवळी पाडली तर 4 मूर्तींचे काय होणार? मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला 'तीर्थकोटी कॉरिडॉर'चा विचार!

Cristiano Ronaldo Retirement: 23 वर्षांचा प्रवास, असंख्य जागतिक रेकॉर्ड! ख्रिस्तियानो रोनाल्डोची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती; कोट्यवधी चाहत्यांचे पाणावले डोळे VIDEO

SCROLL FOR NEXT