C K Naidu Championship Dainik Gomantak
क्रीडा

C K Naidu Trophy: रोहनच्या आक्रमक खेळीने गोव्याचा संघ गारद; राजस्थानने नोंदवला विजय!

Rajasthan defeated Goa: जीसीए मैदानावर बुधवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी लंचपूर्वीच राजस्थानने स्पर्धेतील तिसऱ्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली होती. गोव्याच्या मोहिमेची सांगता पाचव्या पराभवाने झाली.

किशोर पेटकर

C K Naidu Trophy: राजस्थानच्या रोहन राजभर याने आक्रमक शैलीत शतक झळकावले. त्याच्या खेळीच्या जोरावर पाहुण्या संघाने 23 वर्षांखालील कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट ड गट सामन्यात गोव्याचा 9 विकेट्स राखून पराभव केला. दरम्यान, सांगे येथील जीसीए मैदानावर बुधवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी लंचपूर्वीच राजस्थानने स्पर्धेतील तिसऱ्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली होती. गोव्याच्या मोहिमेची सांगता पाचव्या पराभवाने झाली.

दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) 2023-24 मोसमातील गोव्याचा हा पुरुष गटातील अखेरचा सामना होता. राजस्थानने सहा सामन्यांतून 22 गुणांची कमाई करत तिसरा क्रमांक पटकावला होता. सहापैकी फक्त एक सामना जिंकलेल्या गोव्याचे सहा गुण कायम राहिले. त्यांना सात संघांच्या गटात सहावा क्रमांक प्राप्त झाला.

दुसरीकडे, राजस्थानसमोर विजयासाठी 182 धावांचे आव्हान होते. तिसऱ्या दिवसाअखेर त्यांनी बिनबाद 70 धावा केल्या होत्या. बुधवारी रोहन राजभर याने तूफानी फटकेबाजी केली. त्याच्या शतकी खेळीच्या जोरावर राजस्थानने गोव्याचा धुव्वा उडवला. रोहनने आपल्या तूफानी खेळीत 16 चौकार आणि 4 षटकार लगावले. अव्यांश सिंग (नाबाद 45) याच्या साथीने त्याने 176 धावांची शानदार भागिदारी केली. संघाला विजयासाठी सहा धावांची गरज असताना रोहन बाद झाला. अंशुल गढवाल (नाबाद 6) याने षटकार ठोकत राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

SCROLL FOR NEXT