C K Naidu Trophy: गोव्याच्या युवा संघाची उडाली दाणादाण; नायडू करंडक स्पर्धेत रेल्वेचा शानदार विजय

C K Naidu Trophy: बलाढ्य रेल्वे संघाविरुद्ध कर्नल सी. के. नायडू करंडक ड गट सामन्यात गोव्याचा संघ पुन्हा एकदा आपटला.
Jeevan Chittem
Jeevan ChittemDainik Gomantak

C K Naidu Trophy: बलाढ्य रेल्वे संघाविरुद्ध कर्नल सी. के. नायडू करंडक ड गट सामन्यात गोव्याचा संघ पुन्हा एकदा आपटला. चार दिवसीय सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्यांना डाव आणि 161 धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला. राजकोट येथील रेल्वे मैदानावर मंगळवारी यजमान संघाने गोव्याचा पहिला डाव 245 धावांत गुंडाळून 338 धावांची आघाडी घेतली आणि पाहुण्या संघावर फॉलोऑन लादला.

दरम्यान, गोव्याचा दुसरा डाव 177 धावांत आटोपला. रेल्वेचा हा पाच सामन्यांतील चौथा विजय ठरला. त्यांचे 28 गुण झाले असून गटातील अव्वल स्थान कायम आहे. गोव्याला चौथा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सहा गुण कायम राहिले. गोव्याचा पुढील सामना राजस्थानविरुद्ध सांगे येथे खेळला जाईल.

Jeevan Chittem
C. K. Naidu Trophy: गोव्याच्या विजयात मनीषच्या 6 विकेट

संक्षिप्त धावफलक

रेल्वे, पहिला डाव: 583

गोवा, पहिला डाव (6 बाद 198 वरुन): 85.2 षटकांत सर्वबाद 245 (जीवन चित्तेम 23, शौर्य जगलान 20, लखमेश पावणे 2, अनिमेश प्रभुदेसाई 2, शुभम तारी नाबाद 6, ऋत्विक नाईक 2-10, पुर्णांक त्यागी 2-22, तौफिक उद्दीन 5-72).

गोवा, दुसरा डाव: 50.4 षटकांत सर्वबाद 177 (वीर यादव 48, अभिनव तेजराणा 26, राहुल मेहता 21, कौशल हट्टंगडी 7, मयूर कानडे 5, दिशांक मिस्कीन 1, जीवन चित्तेम 50, शौर्य जगलान 3, लखमेश पावणे 0, अनिमेश प्रभुदेसाई नाबाद 0, शुभम तारी 0, पूर्णांक त्यागी 2-31, तौफिक उद्दीन 3-40, एम. डी. जयस्वाल 5-25).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com