Brij Bhushan Sharan Singh Dainik gomantak
क्रीडा

Brijbhushan Sharan Singh: बृजभूषण शरण सिंह यांचा कुस्तीपटूंवर हल्लाबोल, 'विनेश फोगट माझ्यासाठी मंथरा...'

Brijbhushan Sharan Singh: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनी पुन्हा एकदा आंदोलक कुस्तीपटूंवर ताशेरे ओढले.

Manish Jadhav

Brijbhushan Sharan Singh: महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या आरोपांनी घेरलेल्या भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनी पुन्हा एकदा आंदोलक कुस्तीपटूंवर ताशेरे ओढले.

एका कार्यक्रमात त्यांनी विनेश फोगटला मंथरा म्हणत कुस्तीपटूंवर जोरदार टीका केली. 23 एप्रिलपासून जंतरमंतरवर सुरु असलेल्या धरणे आंदोलनाचा समाचार घेत ब्रिजभूषण म्हणाले की, पहिल्यांदाच हजारो कुस्तीपटू जंतरमंतरवर आले आहेत.

ब्रिजभूषण पुढे म्हणाले की, 'ज्याप्रमाणे मंथरा आणि कैकेयी होत्या, त्याचप्रमाणे विनेश फोगट माझ्यासाठी मंथरा म्हणून आली आहे. पण आज मी मंथराचे आभार मानतो, कैकेयीचे आभार मानतो, त्याच प्रमाणे काही दिवसांनी रिजल्ट येईल तेव्हा विनेश फोगटचे आभार मानू.'

दरम्यान, कुस्तीपटूंच्या तक्रारीवरुन ब्रिजभूषण सिंह यांच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ब्रिजभूषण आणि महिला पैलवानांमध्ये शाब्दिक वॉर सुरुच आहे.

एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ब्रिजभूषण यांनी कुस्तीपटूंवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, 'देशाचे खरे खेळाडू स्टेडियममध्ये (Stadium) सराव करतात.

जंतरमंतरवर बसणाऱ्यांचा खेळ संपला आहे.' यातील एकही खेळाडू चाचणीला उपस्थित राहणार नाही, असा दावा त्यांनी केला.

'कुस्ती संघात अशा घटना घडत होत्या तर या खेळाडूंनी यापूर्वी तक्रार का केली नाही, असा सवाल देखील ब्रिजभूषण यांनी उपस्थित केला. कोणाकडे पुरावा का नाही?

दुसरीकडे, ब्रिजभूषण सिंह 5 जूनला अयोध्येत (Ayodhya) रॅलीद्वारे शक्तीप्रदर्शनाच्या तयारीत आहेत. या रॅलीत देशभरातील ऋषी-मुनीही उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

रॅलीमध्ये खोटे आरोप करुन बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाईसाठी सध्याच्या कायद्यात दुरुस्ती आदी विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच, ब्रिजभूषण समर्थक याला बिगर राजकीय रॅली म्हणत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT