Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SA: विराट-रोहित नाहीतर 'हा' स्टार खेळाडू मोडू शकतो लाराचा रेकॉर्ड; खुद्द दिग्गजच म्हणाला...

Brian Lara: टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकेसोबत तिन्ही फॉरमॅटची मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे.

Manish Jadhav

Brian Lara: टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकेसोबत तिन्ही फॉरमॅटची मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया आपल्या पुढील मोहिमेला 10 डिसेंबरपासून सुरुवात करणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात अनेक युवा खेळाडूंना संघात संधी मिळाली आहे. ज्यांच्याकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत.

या दौऱ्यावर सर्वांच्या नजरा कसोटी मालिकेकडे लागल्या आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहलीही कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहेत. पण वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर ब्रायन लारा याने शुभमन गिलबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे.

ब्रायन लाराच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये एक अनोखा विक्रम आहे, जो आजपर्यंत जगातील कोणताही फलंदाज मोडू शकलेला नाही. पण आता लाराला आशा आहे की शुभमन गिल हा विक्रम मोडू शकेल.

गिल लाराचा खास विक्रम मोडेल

खरे तर, क्रिकेटमध्ये रोजच विक्रम होत राहतात. पण असे काही विक्रम आहेत जे मोडणे खूप कठीण आहे. ब्रायन लाराचा कसोटी क्रिकेटमधील विक्रम त्यापैकीच एक आहे. ब्रायन लाराच्या नावावर कसोटी क्रिकेटच्या (Test Cricket) एका डावात 400 धावा करण्याचा खास विक्रम आहे. याशिवाय, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका सामन्यात 501 नाबाद धावा करण्याचा विक्रमही ब्रायन लाराच्या नावावर आहे.

ज्याबाबत आता स्वत: ब्रायन लाराने मोठे वक्तव्य केले आहे. लारा म्हणाला की, 'शुभमन गिल हा आजच्या काळातील सर्वोत्तम फलंदाज आहे आणि मला आशा आहे की तो माझे दोन्ही विक्रम मोडू शकेल. आगामी काळात गिल अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर करेल.'

गिल जबरदस्त फॉर्मात आहे

दरम्यान, शुभमन गिलचा देखील दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी मालिकेत समावेश करण्यात आला आहे. गिलचा अलीकडचा फॉर्मही शानदार आहे. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात त्याने अप्रतिम फलंदाजी केली होती. आता या दौऱ्यातही टीम इंडिया त्याच्याकडून अशाच शानदार कामगिरीची अपेक्षा करेल.

गिलने टीम इंडियासाठी (Team India) 18 कसोटी, 44 एकदिवसीय आणि 11 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 966 धावा, एकदिवसीय सामन्यात 2271 धावा आणि T20 मध्ये 304 धावा केल्या आहेत. गिलने न्यूझीलंडविरुद्ध झळकावलेले एकदिवसीय सामन्यातही त्याच्या नावावर द्विशतक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'गोव्याच्या किनाऱ्यावर...' परदेशी सुंदरींचा मराठी गाण्यावर भन्नाट डान्स, सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

Goa Election 2027: 'मिशन गोवा'साठी भाजपचा मास्टर प्लॅन तयार! राष्ट्रीय अध्यक्षांच्या उपस्थितीत रणनीतीवर शिक्कामोर्तब; विजयाची हॅट्ट्रिकसाठी 'जनसंपर्क पॅटर्न'

"गोवा म्हणजे जणू माझं घरच!", ऑस्ट्रेलियाचा 'हा' दिग्गज अष्टपैलू गोव्याच्या प्रेमात; जुन्या मित्रांच्या भेटीसाठी बेस्ट डेस्टिनेशन

Betim: सफर गोव्याची! डोंगर आणि नदी यांच्यामधील दुवा; निसर्गसंपन्न 'बेती'

पाकिस्ताननं 'B' टीमला हरवलं, पण जल्लोष वर्ल्ड कप जिंकल्यासारखा! शाहबाज शरीफ यांच्या 'प्राइड'वर आकाश चोप्राचा 'मास्टर स्ट्रोक'

SCROLL FOR NEXT