Goa State Ranking Badminton Tournament Dainik Gomantak
क्रीडा

Goa State Ranking Badminton Tournament : अयान शेख, साक्षीची सीनियर एकेरीत बाजी

हर्ष, शाहीन, स्पर्श, आरुष, अद्वैत, निधी, तेजन, रितिकालाही जेतेपद

किशोर पेटकर

बीपीएस स्पोर्टस क्लबच्या राज्य मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत अयान शेख याने पुरुष एकेरीत, तर के. साक्षी हिने महिला एकेरीत विजेतेपद पटकावले. स्पर्धा नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये झाली.

अयानने कारकिर्दीत पुरुष एकेरीतील पहिले जेतेपद मिळविताना चुरशीच्या अंतिम लढतीत निशांत शेणई याच्यावर २१-१९, २८-२६ अशी मात केली. महिला एकेरीत अव्वल मानांकित जान्हवी महाले अंतिम लढत सुरू असताना जायबंदी झाल्यामुळे के. साक्षी विजेती ठरली.

पहिल्या गेममध्ये साक्षी १४-८ अशी आघाडीवर असताना जान्हवीने सामना सोडून दिला. साक्षीने दबदबा राखताना १७ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील मुलींच्या एकेरीत, तसेच १७ वर्षांखालील मिश्र दुहेरीतही जेतेपद प्राप्त केले.

गोवा बॅडमिंटन असोसिएशन, गोवा क्रीडा प्राधिकरण आणि दक्षिण गोवा जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या सहकार्याने घेतलेली ही स्पर्धा पश्चिम विभागीय व राष्ट्रीय स्पर्धा निवड चाचणीपैकी एक होती.

स्पर्धेतील अंतिम निकाल

पुरुष एकेरी ः अयान शेख वि. वि. निशांत शेणई २१-१९, २८-२६, महिला एकेरी ः के. साक्षी वि. वि. जान्हवी महाले १४-८ (जखमी निवृत्त).

पुरुष दुहेरी ः अर्जुन फळारी व तेजन फळारी वि. वि. पराग चौहान व सुशील नायक २१-१५, २१-१४, मिश्र दुहेरी ः तेजन फळारी व लिडिया बार्रेटो वि. वि. आर्यमान सराफ व निधी देसाई २१-१९, २१-१४.

११ वर्षांखालील वयोगट ः मुलगे एकेरी ः मायकल मारे वि. वि. नील पंजानी बक्षी १५-१३, १५-७, मुली एकेरी ः अवनी ख्यालिया वि. वि. प्रग्या अवदी १५-६, १५-३.

१३ वर्षांखालील वयोगट ः मुलगे एकेरी ः स्पर्श कोलवाळकर वि. वि. अंश चौरासिया २५-२७, २१-१५, २१-६, मुली एकेरी ः आर्या मेत्री वि. वि. अनाया कामत १५-१२, १४-१६, २०-१८, मुलगे दुहेरी ः अर्णव सराफ व स्पर्श कोलवाळकर वि. वि. अंश चौरासिया व लिनेश विर्नोडकर २३-२५, २१-१७, २१-१६, मुली दुहेरी ः आर्या मेत्री व डिंपल रेवणकर वि. वि. निहारिका परवार व पलक रामनाथकर २१-७, २१-१२.

१५ वर्षांखालील वयोगट ः मुलगे एकेरी ः आरुष पावसकर वि. वि. अद्वैत बाळकृष्णन २१-९, २१-१४, मुली एकेरी ः रितिका चेल्लुरी वि. वि. शिवांजली थिटे २१-१९, १०-२१, २१-१७, मुलगे दुहेरी ः आरुष पावसकर व अद्वैत बाळकृष्णन वि. वि. ऋषी पै खोत व वेद शेट्ये २१-१८, २१-१४, मुली दुहेरी ः शिवांजली थिटे व सुफिया शेख वि. वि. ईशा बोरकर व ज्वेल अब्रांचिस २१-१०, २१-८, मिश्र दुहेरी ः अद्वैत बाळकृष्णन व रितिका चेल्लुरी वि. वि. शेन डिसोझा व सान्वी अवदी २१-८, २१-९.

१७ वर्षांखालील वयोगट ः मुलगे एकेरी ः हर्ष माने वि. वि. यश देसाई २१-१८, २१-१७, मुली एकेरी ः के. साक्षी वि. वि. रितिका चेल्लुरी २१-१२, २१-६, मुलगे दुहेरी ः हर्ष माने व सी. के. शाहीन वि. वि. अर्जुन भगत व यश देसाई २१-१८, २१-१९, मुली दुहेरी ः श्रेया मेहता व सौम्या देशपांडे वि. वि. आद्या चौरासिया व लक्षिता सावळ २१-१२, २१-१४, मिश्र दुहेरी ः सी. के. शाहीन व के. साक्षी वि. वि. युसूफ शेख व सुफिया शेख २१-१०, २१-२३, २१-१०.

१९ वर्षांखालील वयोगट ः मुलगे एकेरी ः अर्जुन भगत वि. वि. पार्थ जोशी २१-१०, २१-१६, मुली एकेरी ः साक्षी वि. वि. ट्विंकल सुल्लद २१-१३, १४-० (जखमी निवृत्त), मुलगे दुहेरी ः अश्मीत पार्सेकर व यश देसाई वि. वि. पार्थ जोशी व श्रीजय नाईक २१-१४, २१-१९, मुली दुहेरी ः निधी देसाई व रिया हळदणकर वि. वि. मलिका लोबो व सिन्नोव्हिया डिसोझा २१-१५, २१-१७.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT