Goa Corona Update : दिलासा! राज्यात 2 नवे कोरोना रुग्ण

आज दिवसभरात 224 नमुने तपासण्यात आले
Corona
CoronaDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यात गेले काही दिवस कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर होती. मात्र आता कोरोना रुग्णसंखेत वाढ होताना दिसत आहे. गोवा आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार आज (रविवार) दिवसभरात राज्यात दोन नवीन कोरोनाबाधित रूग्णाची वाढ झाली असून, गेल्या 24 तासांत एकाही कोरोनामुक्त रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आलेला नाही.

Corona
Ponda Crime News : 43 किलो तांब्याच्या साहित्याची चोरी करणाऱ्या तीघांना अटक; फोंडा पोलिसांची कारवाई

आरोग्य विभागाने रविवारी सायंकाळी प्रसिद्ध केलेल्या कोरोना अहवालानुसार, आज दिवसभरात 224 नमुने तपासण्यात आले, त्यापैकी दोन रूग्णांचा अहवाल सकारात्मक आला आहे. तर, दिवसभरात एकाही कोरोनामुक्त रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आलेला नाही.

राज्यात सध्याच्या घडीला केवळ 9 सक्रिय कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, गोव्यात आजवर 2 लाख 63 हजार 325 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी 2 लाख 59 हजार 302 जण कोरोनामुक्त झाले. राज्यात आजवर 4,014 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. गोव्याचा रिकव्हरी रेट 98.47 टक्के एवढा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Natural Gas Private Limited
Goa Food Price Increase
Decomposed tiger found Sakorda Goa
Gas Agency Stock Report
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com