Sumit Nagal: नागलने टॅम्पेरे ओपन जिंकून रचला इतिहास, युरोपमध्ये कोणत्याच भारतीयाला न जमलेला विक्रम नावावर

Tampere Open: भारताचा स्टार टेनिसपटू सुमित नागलने टॅम्पेरे ओपन स्पर्धेचे विजेतेपद जिंकत इतिहास रचला.
Sumit Nagal
Sumit NagalDainik Gomantak
Published on
Updated on

Sumit Nagal won Tampere Open 2023: भारताचा स्टार टेनिसपटू सुमीत नागलने फिनलँडमध्ये टॅम्पेरे ओपन स्पर्धा जिंकून मोठा कारनामा केला आहे. हे त्याचे या वर्षातील दुसरे एटीपी चँलेजर विजेतेपद आहे. या विजेतेपदामुळे नागल आता पुन्हा क्रमावारीत पहिल्या 200 खेळाडूंमध्ये पुनरागमन करेल.

नागलने रविवारी टॅम्पेरे ओपन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात चेक प्रजासत्ताकच्या डेलीबोर स्वर्सिनाला 6-4, 7-5 अशा सरळ दोन सेटमध्ये पराभूत करत विजेतेपद जिंकले.

त्यामुळे नागल पहिलाच भारतीय टेनिसपटू ठरला आहे, ज्याने युरोपमध्ये दोन एटीपी चॅलेंजर स्पर्धांचे विजेतेपद पटकावले आहे. यापूर्वी देव वर्मन, रोहन बोपन्ना आणि एच मांकड यांनी युरोपमध्ये प्रत्येकी 1 एटीपी चॅलेंजर ट्रॉफी जिंकली होती.

Sumit Nagal
Novak Djokovic vs Carlos Alcaraz: 20 वर्षांच्या अल्कारेजने हरवल्यावर जोकोविच म्हणतोय, 'त्याच्याकडे फेडरर, राफा अन् माझे...'

याशिवाय टॅम्पेरे ओपन स्पर्धेतील विजेतेपद नागलचे कारकिर्दीतील चौथे एटीपी चॅलेंजर विजेतेपद आहे. तसेच मातीच्या कोर्टवरील तिसरे विजेतेपद आहे.

अंतिम सामन्यात रोमांचक विजय

डेलीबोर स्वर्सिनाविरुद्ध झालेला अंतिम सामना 1 तास 45 मिनिटे झाला. या सामन्यात नागलची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. त्याने त्याची पहिली सर्विस गमावली होती. तसेच त्याला पहिल्याच सेटमध्ये 3-0 असे पिछाडीवरही राहावे लागले.

त्यानंतर त्याने दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी एक गेम जिंकली. त्यामुळे 4-1 अशी स्थिती होती. पण नागलने नंतर जबरदस्त खेळ केला. त्याने डेलीबोर स्वर्सिनाची सर्विस तीनदा तोडताना सेट 6-4 असा जिंकला.

Sumit Nagal
अमेरिकन टेनिस स्पर्धेत डॉमनिक थिमकडून सुमीत नागल पराभूत

सातव्या मानांकित नागलने दुसऱ्या सेटमध्ये आपली लय कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याने 4-1 अशी आघाडीही मिळवली होती. पण पाचव्या मानांकित डेलीबोर स्वर्सिनानेही चांगले पुनरागमन केले आणि सेट 5-5 असा बरोबरीत आणला होता.

पण त्यानंतर नागलने डेलीबोरची सर्विस तोडत 6-5 अशी आघाडी घेतली आणि चॅम्पियन पाँइंट्स मिळवत सामनाही जिंकला. याबरोबरच विजेतेपदही नावावर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com