KL Rahul and Athiya Shetty  Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022: केएल राहुल 'क्लीन बोल्ड' झाल्याने अथिया शेट्टी नाराज

क्रिकेटर केएल राहुलसोबत अथिया शेट्टीचे नाव अनेकदा चर्चेत येते.

दैनिक गोमन्तक

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मधील लखनऊ सुपर जायंट्स (LSG) कर्णधार केएल राहुलच्या कामगिरीत चढ-उतार होत आहेत. पाच डावांपैकी दोन डावात तो शून्यावर बाद झाला तर, दोन सामन्यात त्याने 40 आणि 68 धावा करून संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. (Bollywood actress Athiya Shetty upset over KL Rahul's dismissal in IPL)

केएल राहुलने राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध हंगामातील दुसरा गोल्डन डक झळकावला. डावाच्या पहिल्या चेंडूवर राहुलला किवी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने क्लीन बोल्ड केले. याआधी गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यातही मोहम्मद शमीने राहुलला पहिल्याच चेंडूवर पायचीत केले होते.

राजस्थानविरुद्धच्या (Rajasthan) सामन्यात लखनऊच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सुनील शेट्टी आणि त्याची मुलगी अथिया शेट्टीही पोहोचली होती. पहिल्याच चेंडूवर केएल राहुल बाद झाला तेव्हा दोघांच्याही चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. क्रिकेटर केएल राहुलसोबत अथिया शेट्टीचे नाव अनेकदा चर्चेत येते. दोघेही अनेकदा एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.

असा होता सामना
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 षटकात 6 बाद 165 धावा केल्या. शिमरॉन हेटमायरने 36 चेंडूंत नाबाद 59 धावा केल्या, ज्यात सहा षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. याशिवाय देवदत्त पडिक्कलने 29 आणि रविचंद्रन अश्विनने 28 धावांचे योगदान दिले. लखनौ सुपर जायंट्ससाठी जेसन होल्डर आणि कृष्णप्पा गौतम यांनी प्रत्येकी दोन यश मिळवले. प्रत्युत्तरात लखनौ सुपर जायंट्सला 20 षटकांत 8 बाद 162 धावाच करता आल्या आणि त्यांना तीन धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने सर्वाधिक 39 आणि मार्कस स्टॉइनिसने नाबाद 38 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून युझवेंद्र चहलने सर्वाधिक चार आणि ट्रेंट बोल्टने दोन खेळाडूंना बाद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये मॅनेजमेंट कॉलेज जवळ रात्री चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT