आयपीएलच्या 18 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने मुंबई इंडियन्सचा सात गडी राखून पराभव केला. शनिवारी झालेल्या या सामन्यात विराट कोहलीला बाद करण्यावरून वाद निर्माण झाला आहे. डिवाल्ड ब्रेविसच्या गोलंदाजीवर कोहलीला एलबीडब्ल्यू आऊट करण्यात आले. या निर्णयाला आव्हान देत विराटने रिव्ह्यू घेतला, मात्र तिसऱ्या पंचानेही त्याला बाद घोषित केले. त्यानंतर कोहली रागाच्या भरात पॅव्हेलियनमध्ये परतला. (controversy over Virat Kohli's wicket in MI vs RCB match)
या निर्णयाला आरसीबीने (RCB) विरोध केला आहे. विराट कोहलीचा फोटो ट्विटरवर शेअर एमसीसीचे नियम लिहिले आहेत. आरसीबीने ट्विट करून लिहिले की, “आम्ही एलबीडब्ल्यू निर्णयांबाबत एमसीसीचे नियम वाचत आहोत. विराट कोहलीला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले हे दुर्दैव आहे. नियम 36.2.2 नुसार, जेव्हा चेंडू बॅटला आणि पॅडला एकाच वेळी आदळतो तेव्हा तो बॅटला आधीच आदळला आहे असे मानले जाते.
विराट 48 धावांवर फलंदाजी करत होता. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) 19व्या षटकात दक्षिण आफ्रिकेचा युवा खेळाडू डेवाल्ड ब्रेव्हिसला गोलंदाजी करण्यास सांगितले. ब्रेव्हिसचा पहिला चेंडू विराटच्या बॅटला आणि पॅडला एकाच वेळी लागला. ब्रेव्हिसच्या अपीलवर अंपायरने विराटला बाद घोषित केले. तिसर्या पंचाने देखील मैदानावरील पंचाचा निर्णय रद्द केला नाही. जेव्हा चेंडू बॅट आणि पॅडला एकाच वेळी आदळला तेव्हा त्याने मैदानावरील पंचाचा निर्णय कायम ठेवला.
या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सने (MI) 20 षटकांत 6 बाद 151 धावा केल्या. त्यासाठी सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 68 धावा केल्या. त्याने 37 चेंडूंच्या खेळीत पाच चौकार आणि सहा षटकार मारले. प्रत्युत्तरात आरसीबीने 18.3 षटकांत तीन गडी गमावून 152 धावा करून सामना जिंकला. 22 वर्षीय युवा फलंदाज अनुज रावतने 47 चेंडूत सर्वाधिक 66 धावा केल्या. विराटने 36 चेंडूत 48 धावांची खेळी खेळली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.