Blast in Kabul Cricket Stadium Twitter
क्रीडा

Kabul स्टेडियमवर T20 सामन्यादरम्यान बॉम्बस्फोट, विश्वचषक खेळणारे खेळाडू थोडक्यात बचावले

अफगाणिस्तानात तालिबान राजवटीत क्रिकेट खेळाडू किती सुरक्षित आहेत, याचा अंदाज या घटनेवरून लावता येतो.

दैनिक गोमन्तक

Blast in Kabul Cricket Stadium: अफगाणिस्तानात तालिबान राजवट आल्यानंतर क्रिकेटवर कोणत्याही प्रकारे बंदी घातली गेली की नाही यावर प्रश्नउपस्थित होत आहे. पण, इथे खेळाडू किती सुरक्षित आहेत, याचा अंदाज एका घटनेवरून लावता येतो. अफगाणिस्तानच्या शापागिझा टी-20 क्रिकेट लीगच्या सामन्यादरम्यान काबुल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आत्मघाती बॉम्बस्फोट झाला. यामध्ये चार प्रेक्षक जखमी झाले. हा सामना पामिर जाल्मी आणि बँड-ए-आमिर ड्रॅगन्स संघ यांच्यात खेळला गेला. अफगाणिस्तानकडून विश्वचषक खेळणारे अनेक खेळाडूही या सामन्यात सहभागी झाले होते. सुदैवाने त्यापैकी कोणालाही दुखापत झाली नाही.

थेट सामन्यादरम्यान झालेल्या स्फोटानंतर स्टेडियममध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही संघातील खेळाडूंना बंकरच्या आत नेण्यात आले. हल्ला झाला तेव्हा संयुक्त राष्ट्राचे अधिकारीही स्टेडियममध्ये उपस्थित होते. सामना 1 तास थांबवावा लागला. मात्र, पोलिसांकडून हिरवा सिग्नल मिळाल्यानंतर सामना पुन्हा सुरू झाला आणि बँड-ए-आमिर ड्रॅगन्स संघाने डकवर्थ-लुईस नियमानुसार बदललेले 10 षटकांत 17 चेंडू राखून 1 गडी गमावून 94 धावांचे लक्ष्य गाठले. तत्पूर्वी, पामिर जाल्मी संघाने 20 षटकांत 5 गडी गमावून 159 धावा केल्या होत्या.

बॉम्बस्फोटानंतर एक तासानंतर सामना सुरू झाला

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ नसीब खान यांनी ESPNcricinfo ला सांगितले की, "स्फोटानंतर लगेचच, काबूल पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि ज्या ठिकाणी स्फोट झाला ते स्टँड रिकामे करून सखोल तपास केला. एक तासानंतर, त्यांनी आम्हाला सामना पुन्हा सुरू करण्यास होकार दिला."

या सामन्यात अफगाणिस्तानचे स्टार खेळाडू सहभागी झाले होते. शापागिझा T20 क्रिकेट लीगच्या या सामन्यात अफगाणिस्तानचे अनेक मोठे खेळाडू खेळत होते. यामध्ये विश्वचषकाचा हिरो शापूर जद्रान पामीर जाल्मी संघाचे नेतृत्व करत होता. त्यांच्या व्यतिरिक्त, 2021 च्या T20 विश्वचषकात संघाच्या राखीव खेळाडूंपैकी एक असलेला दौलत झद्रान आणि या वर्षीच्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तान संघासोबत असलेला मोहम्मदउल्ला नजीबुल्लानेही या सामन्यात भाग घेतला होता.

शापागिझा प्रीमियर लीग IPL सारखी शापगिझा प्रीमियर लीग ही अफगाणिस्तानची IPL सारखी प्रमुख देशांतर्गत T20 स्पर्धा आहे, जी पूर्णपणे काबुलमध्ये खेळली जाते. त्याची सुरुवात 2013 मध्ये झाली होती. ज्या सामन्यात आत्मघाती बॉम्बस्फोट झाला तो या मोसमातील 22वा सामना होता. सध्या साखळी टप्प्यातील 6 सामने बाकी आहेत. यानंतर 3 प्लेऑफ आणि फायनल होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT