Ironman 70.3 Dainik Gomantak
क्रीडा

Ironman 70.3: बिश्वर्जित विजेतेपद राखण्यास इच्छुक

गतविजेत्याच्या गोव्यातील स्पर्धेत यंदा सहभाग

दैनिक गोमन्तक

पणजी: सेनादलाचा बिश्वर्जित साइखोम पुन्हा एकदा गोव्यात जलतरण, सायकलिंग व धावण्याचे कौशल्य आजमावणार असून आयर्नमॅन 70.3 विजेतेपद राखण्यासाठी इच्छुक आहे. यावेळची स्पर्धा येत्या 13 नोव्हेंबरला होईल.

(Biswarjit Saikho will participate in the Ironman 70.3 competition)

आयर्नमॅन 70.3 स्पर्धा 2019 साली सर्वप्रथम गोव्यात झाली. तेव्हा मणिपूरमधील बिश्वर्जित याने साडेआठ तास वेळ नोंदवत अग्रस्थान मिळविले. या कालावधीत त्याने 1.9 किलोमीटर जलतरण, 90 किलोमीटर सायकलिंग व 21 किलोमीटर धावणे हे एकूण 113 किलोमीटर अंतर कापले आणि शारीरिक तंदुरुस्तीचे शानदार प्रदर्शन घडविले होते.

सायकलसाठी स्पर्धेत सहभाग

मणिपूरमधील इंफाळजवळील एका लहानशा गावातील बिश्वर्जितने वयाच्या 17 वर्षीपासून ट्रायथलॉन स्पर्धांत भाग घेण्यास सुरवात केली. त्याला मोठ्या भावाकडून प्रेरणा मिळाली होती. घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे बिश्वर्जितपाशी सायकल नव्हती. ट्रायथलॉनसाठी त्याला उसनवारीवर सायकल घ्यावी लागत असे. हैदराबादमधील एका ट्रायथलॉन स्पर्धेत विजेत्याला सायकल बक्षीस मिळणार असल्याची माहिती बिश्वर्जितला मिळाली. केवळ सायकल जिंकण्यापोटी त्याने अथक मेहनत घेतली आणि कारकिर्दीतील पहिली स्पर्धा जिंकली.

सेनादलाचे सहकार्य

सेनादलात रुजू झाल्यापासून बिश्वर्जितचा सरावाचा प्रश्न सुटला आहे. सेनादलाच्या सायकलिंग आणि ट्रॅक अँड फिल्ड चमूसमवेत त्याने सराव करण्यास सुरवात केली. ट्रायथलॉन हा खडतर खेळ असल्याचे त्याचे मत आहे. कुटुंबीय आणि मित्रांच्या पाठिंबामुळे मानसिक पाठबळ लाभले आणि आपण ट्रायथलॉनमध्ये पूर्ण लक्ष केंद्रित करू शकतो, असे या 32 वर्षीय ट्रायथलिटने नमूद केले.

``मागील वेळचे विजेतेपद राखण्यासाठी या वर्षी मला कठीण आव्हान अपेक्षित आहे. सर्वोत्तम कामगिरीसह पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक आयर्नमॅन स्पर्धेसाठी पात्रता मिळविणे हेच उद्दिष्ट्य आहे.``- बिश्वर्जित सिंग, सेनादलाचा ट्रायथलिट

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

Goa Cabinet: चतुर्थीपूर्वी मंत्रिमंडळात होऊ शकतो बदल; दामू नाईकांचा संकेत; मुख्‍यमंत्र्यांकडून ‘सस्‍पेन्‍स’ कायम

Coconut Price Goa: 45 रुपयांचा नारळ स्वस्त कसा? विजय सरदेसाईंचा सवाल

SCROLL FOR NEXT