Bishan Singh Bedi ICC
क्रीडा

Bishan Singh Bedi: 'सरदार ऑफ स्पिन' बिशन सिंग बेदी यांची कशी होती कारकिर्द? पाहा आकडेवारी

Bishan Singh Bedi Record: माजी क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचे ७७ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीचा घेतलेला एक आढावा.

Pranali Kodre

Bishan Singh Bedi cricket career records:

सोमवारी भारतीय क्रिकेट विश्वासाठी अचानक एक दु:खद बातमी समोर आली. भारताचे दिग्गज क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी वयाच्या 77 व्या अखेरचा श्वास घेतला.

अमृतसरला 25 सप्टेंबर 1947 रोजी जन्मलेल्या बिशन सिंग बेदी यांनी त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 67 कसोटी सामने खेळले होते. तसेच 10 वनडे सामने खेळले.

त्यांनी कसोटीमध्ये 266 विकेट्स घेतल्या. त्यांनी कसोटीत 14 वेळा एका डावात 5 पेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली, तर एक वेळा सामन्यात 10 विकेट्स घेतल्या. त्यांनी 1977 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ येथे 10 विकेट्स घेतल्या होत्या. ते कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे आठव्या क्रमांकाचे भारतीय क्रिकेटपटू आहेत.

त्यांनी वनडेत 7 विकेट्स घेतल्या. ते 70 आणि 80 च्या दशकातील भारतीय संघाचे प्रमुख फिरकीपटू होते. त्यांनी 1975 आणि 1979 वनडे वर्ल्डकपही खेळले.

बिशन सिंग बेदी कारकिर्दीतील अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना 1979 मध्ये इंग्लंड विरुद्ध द ओव्हलवर खेळले. हा कसोटी सामना होता.

सरदार ऑफ स्पिन

बिशन सिंग बेदी यांना सरदार ऑफ स्पिन असेही म्हटले जाते. ते 70 आणि 80 च्या दशकात क्रिकेटविश्व गाजवलेल्या भारताच्या फिरकी चौकटीचा भाग होते. त्यांनी इरापल्ली प्रसन्ना, श्रीनिवास वेंकटराघवन आणि भागवत चंद्रशेखर या फिरकीपटूंसह क्रिकेटचे मैदान गाजवले.

या चौकटीच्या मदतीने भारताने न्यूझीलंड (1967-68), वेस्ट इंडिज (1970-71) आणि इंग्लंड (1971) या संघांविरुद्ध मालिका विजयही मिळवले. या चौघांनी मिळून 231 कसोटी सामने खेळले आणि 853 बळी घेतले आहेत.

बिशन सिंग बेदी यांच्यासाठी 1977-78 चा ऑस्ट्रेलिया दौरा सर्वात्तम ठरला. त्यांनी या दौऱ्यात 31 विकेट्स घेतल्या.

त्यांनी 1976 साली मन्सूर अली खान पतौडी यांच्यानंतर भारतीय संघाच्या नेतृत्वाची धूरा सांभाळली. त्यांनी 22 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्वही केले. पोर्ट ऑफ स्पेनला वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांनी कर्णधार म्हणून पहिला विजय मिळवला.

प्रथम श्रेणी क्रिकेटमधील दिग्गज

बिशन सिंग बेदी यांनी वयाच्या 15 व्या वर्षी उत्तर पंजाबकडून देशांतर्गत क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. पण नंतर 1968 पासून ते दिल्लीकडून खेळायला लागले.

त्यांनी त्याच्या कारकिर्दीत 370 प्रथम श्रेणी सामने खेळताना 1560 विकेट्स घेतल्या. तसेच 7 अर्धशतकांसह 3584 धावाही केल्या. ते प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज आहेत. आजही हा विक्रम त्यांच्याच नावावर आहे.

पुरस्कार

बेदी यांना त्यांच्या कारकिर्दीत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले, त्यातील उल्लेखनीय म्हणजे 1970 मध्ये त्यांना भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्रीने गौरविण्यात आले. तसेच त्यांना 2004 मध्ये सीके नायुडू जीवन गौरव पुरस्कार मिळाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT