'अरे ते पाहा स्पायडर कॅमवर...' IND vs NZ सामन्यातील बेस्ट फिल्डरचा हटके खुलासा, पाहा Video

Team India Best Fielder: भारत-न्यूझीलंड सामन्यातील बेस्ट फिल्डरचा खुलासा स्पायडर कॅमकडून! फोटो पाहाताच जडेजाने घातले मेडल, पाहा व्हिडिओ
Best Fielder Medal
Best Fielder MedalBCCI
Published on
Updated on

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs New Zealand, Best Fielder Video:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा सुरू झाल्यापासून भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये एक नवी परंपरा पाहायला मिळाली आहे. या स्पर्धेदरम्यान भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये प्रत्येक सामन्यानंतर संघातील एका खेळाडूची क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप यांच्याकडून सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून निवड केली जाते.

तसेच प्रत्येकवेळी सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाच्या पदकाच्या विजेत्याची घोषणा वेगवेगळ्या प्रकारे केली जात आहे. कधी टीव्हीवर, कधी स्टेडियममधील स्क्रिनवर विजेत्याची घोषणा करण्यात आली.

त्यानुसार रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यानंतरही टी दिलीप यांनी एका खेळाडूची सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाच्या पदकाच्या विजेत्याची घोषणा केली. यावेळी मैदानातील स्पायडर कॅमवर विजेत्या खेळाडूचा फोटो लटकवून ही घोषणा करण्यात आली. या सामन्यात श्रेयस अय्यरला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून निवडण्यात आले. याचा व्हिडिओही बीसीसीआयने शेअर केला आहे.

Best Fielder Medal
IND vs AUS मॅचनंतर ड्रेसिंग रुममध्ये मेडल जिंकताच विराट भलताच खूश, BCCI ने शेअर केला BTS व्हिडिओ

या व्हिडिओमध्ये आधी मोहम्मद शमी पत्रकारांशी या पदकासंदर्भात बोलताना दिसत आहे. त्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये टी दिलीप हे या सामन्यातील भारताच्या क्षेत्ररक्षणाबद्दल बोलत आहे. यावेळी त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध क्षेत्ररक्षणादरम्यान काही चूका झाल्याचेही सांगितले.

भारताकडून या सामन्यात काही झेल सुटले होते. पण त्यानंतर भारतीय संघाने चांगले पुनरागमन केल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी या सामन्यात मोहम्मद सिराज, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी क्षेत्ररक्षणात दिलेल्या योगदानाचेही कौतुक केले.

यानंतर त्यांनी सर्व खेळाडूंना बाहेर येण्यास सांगितले. त्यावेळी सर्व खेळाडू आता विजेता खेळाडू कोणत्या मार्गाने कळणार याचे अंदाज लावत बाहेर आले. त्यानंतर मैदानात सर्व खेळाडू आल्यानंतर रविंद्र जडेजाने स्पायडर कॅमवर विजेत्या श्रेयस अय्यरचा फोटो पाहिल्यानंतर सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचे पदक त्याच्या गळ्यात घातले.

Best Fielder Medal
World Cup 2023: शमीचं ऐतिहासिक विकेट्सचं पंचक! 'हा' कारनामा करणारा बनला पहिलाच भारतीय गोलंदाज

जडेजा याआधी बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात सर्वोत्तम क्षेत्ररक्षक ठरला होता, त्यानंतर आता तो मान अय्यरने पटकावल्याने त्याने हे पदक त्याला दिले. दरम्यान, नंतर कुलदीपने स्पायडर कॅमवरील श्रेयसचा फोटो काढून तो देखील त्याच्या गळ्यात घातला. यावेळी भारतीय संघातील खेळाडूंनीही जल्लोष केला. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

श्रेयस अय्यरच्या क्षेत्ररक्षणाबद्दल सांगायचे झाले, तर त्याने भारतासाठी धावा वाचवण्याबरोबरच डेवॉन कॉनवेचा एक उत्तम झेलही घेतला.

या सामन्यात भारताला न्यूझीलंडने 274 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान भारताने 48 षटकात 6 विकेट्स गमावत पूर्ण केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com